Khatron ke Khiladi 15 Rohit Shetty  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khatron ke Khiladi 15: 'खतरों के खिलाडी' संकटात! रोहित शेट्टी नाराज, निर्मात्यांची शोमधून घेतली माघार

Khatron ke Khiladi 15 : 'खतरों के खिलाडी' हा टीव्हीवरील एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे, ज्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहे. या शोचे भवितव्य सध्या धोक्यात आले आहे.

Shruti Vilas Kadam

Khatron ke Khiladi 15: 'खतरों के खिलाडी' हा टीव्हीवरील एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे, ज्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहे. मात्र अलीकडील घडामोडींनुसार या शोचे भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, शोचे प्रमुख निर्माते 'बनिजे एशिया' यांनी आगामी सिझनसाठी माघार घेतली आहे. ही गोष्ट केवळ चाहत्यांसाठीच नव्हे, तर होस्ट रोहित शेट्टीसाठीही धक्कादायक आहे.

बनिजे एशिया ही कंपनी 'खतरों के खिलाडी'ची निर्मिती गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. त्यांनी अचानक माघार घेतल्याने संपूर्ण टीममध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, बनिजेने काही अंतर्गत कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा परिणाम थेट शोच्या पुढील सिझनवर होणार असल्याने संपूर्ण टीम अडचणीत आली आहे.

होस्ट रोहित शेट्टी या घटनेमुळे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, तो शोच्या भविष्यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित शेट्टीने या शोला केवळ लोकप्रियच केल नाही, तर खूपच वेगळं रूप दिलं आहे. त्यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे.

सध्या 'खतरों के खिलाडी'च्या चाहत्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शोबाबतची काळजी व्यक्त केली आहे. निर्माते बदलल्याने शोची गुणवत्ता, स्वरूप आणि सादरीकरण यावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या निर्मात्यांच्या शोधात टीम आहे की शो काही काळासाठी थांबवण्यात येणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT