Rohit Shetty House Firing Case connection with baba siddique Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी यांच्या घरावरील हल्ल्याला नवे वळण मिळाले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील गँगचा या हल्ल्याशी थेट संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Shruti Vilas Kadam

Rohit Shetty House Firing Case: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण बॉलीवूडसह चाहत्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील गँगचा बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याशी थेट संबंध असल्याचा धक्कादायक संशय समोर आला आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले चार जण हे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सक्रिय लेल्या त्याच गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमधील कनेक्शन स्पष्ट होत असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात यापूर्वी पुणे कनेक्शन समोर आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समजल्या होत्या. तपासात उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील युवकांचा या हत्याकांडात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच पुण्यातील गँग सदस्यांनी या गुन्ह्यासाठी योजना, आणि लॉजिस्टिक मदत दिल्याचेही स्पष्ट झाले होते.

आता त्याच गँगचे सदस्य बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. पुण्यातील वारजे आणि कर्वेनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले चारही आरोपी हे याच गँगशी संबंधित असल्याची माहिती आहे. या आरोपींच्या हालचाली, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, त्यांचे मुंबईतील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असल्याचे चिन्ह मिळत आहेत.

रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. बॉलीवूडशी संबंधित प्रसिद्ध व्यक्तींवरील वाढते हल्ले आणि त्यामागील असलेल्या गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुणे पोलिसांकडून सध्या या चारही आरोपींची कसून चौकशी सुरू असून, लवकरच त्यांना पुढील तपासासाठी मुंबई क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT