Rohit Shetty House Firing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचं पुणे कनेक्शन, पुण्याच्या मोक्याच्या ठिकाणाहून ४ जणांना अटक

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे. वारजे, कर्वेनगरमधून 4 जण ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखेकडे या चौघांना सुपूर्द करण्यात आले आहे.

Akshay Badve

Rohit Shetty House Firing: बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून या घटनेत पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पुण्यातील वारजे आणि कर्वेनगर परिसरातून करण्यात आली असून, एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले चारही जण देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चौघांची पार्श्वभूमी, संपर्क आणि हालचाली संशयास्पद असल्याने पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. चौकशीदरम्यान या आरोपींचे मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचे चिन्ह दिसून आले आहेत.

रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात आणि राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांसह राज्यातील विविध तपास यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तपासाची सूत्रे अधिक घट्ट करत पुण्यातील काही संशयित हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील गँगचा बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याशी संबंध असल्याचा गंभीर संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले चार जण हे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सक्रिय भूमिका बजावलेल्या त्याच गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT