PSI Arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

PSI Arjun: 'लूक्स ऑसम...'; अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटासाठी रितेश देशमुखने दिल्या खास शुभेच्छा

PSI Arjun Marathi Movie :अंकुश चौधरी दोन वर्षांनंतर ‘पी.एस.आय अर्जुन’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने त्याला रितेश देशमुखने दिल्या खास शुभेच्छा दिल्या आहेत

Shruti Vilas Kadam

PSI Arjun Marathi Movie : मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला असून नुकतेच ‘पी.एस.आय अर्जुन’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. दोन वर्षांनंतर पडद्यावर झळकताना अंकुश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या या रुबाबदार लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. स्टाईल आयकॉन अंकुशच्या या जबरदस्त लुकमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली असून ‘पी.एस.आय. अर्जुन’चे पोस्टर पाहूनच त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत रितेश देशमुखने त्याच्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुखचा या खास पाठींब्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या या नव्या प्रवासाला चाहते आणि इंडस्ट्रीमधील मित्रमंडळींनी दिलेला भरभरून प्रतिसाद बघता, ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटावर आधीच हिट होण्याची मोहोर उमटली आहे.

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन' हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT