Ved Movie New Update Instagram @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved Movie: 'वेड'च्या यशानंतर प्रेक्षकांना जाणवली एक कमी, रितेश सिनेमात लवकरच करणार मोठा बदल?

रितेश देशमुख पूर्ण करणार प्रेक्षकांचे 'वेड', पोस्ट शेअर करत दिली माहिती.

Pooja Dange

Ved Movie Update: 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाची क्रेझ वाढत आहे. क्रेझसोबत चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील कॉलेक्शनमध्ये सुद्धा वाढ होत आहे. या सगळ्यात चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने मोठी घोषणा केली आहे.

रितेश देशमुखने त्याचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश आणि शुभंकर तावडे दिसत आहेत. या दोघांनी चित्रपटातील एका सीनचा रिमेक या व्हिडिओमध्ये केला आहे.परंतु सीनचा रिमेक करताना त्यांनी संवाद थोडे बदलले आहेत. या संवादाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटाशी निगडीत एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

'वेड' चित्रपटाप्रमाणे चित्रपटातील गाणी सुद्धा हिट ठरली आहेत. प्रेक्षकांमध्ये चित्रपटातील गाण्यांविषयी एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. हेच लक्षात घेऊन रितेश 'वेड' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील आणखी एक गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय रितेशने घेतला आहे. त्याच संदर्भात रितेश आणि शुभंकर या व्हिडिओमध्ये बोलत आहेत.

'वेड' चित्रपटामध्ये रितेश आणि जेनेलिया यांचे एकही रोमॅंटिक गाणे नाही. रितेश आणि जेनेलिया याचे रोमँटिक गाणे असावे अशी प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच सत्या आणि श्रावणी यांच्यावर एक रोमँटिक गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती खुद्द रितेशने दिली आहे. रितेशच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. तसेच या नवीन गाण्यासाठी उत्सुक असल्याचे कमेंट करून सांगत आहेत.

'वेड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. १७ व्या दिवशी या चित्रपटाने ३.४० करोडची कमाई केली आहे. वेड चित्रपटाची एकूण कमाई ४८. ४२ करोडची कमाई केली आहे. सैराट चित्रपटानंतर 'वेड' हा दुसरा मराठी चित्रपट आहे ज्याला बॉक्स ऑफिस इतका गल्ला जमवण्यात यश मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT