Ved Moie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ved World Television Premiere: श्रावणी आणि सत्याची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार

Ved World Television Premiere: सिनेमातले संवाद, गाणी आणि रितेश आणि जिनिलिया देशमुख या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं.

साम टिव्ही ब्युरो

Ved World Television Premiere News: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलिया देशमुख निर्मित वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. सिनेमातले संवाद, गाणी आणि रितेश आणि जिनिलिया देशमुख या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. प्रेमातला हा वेडेपणा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आली आहे. (Latest Marathi News)

२० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांना पाहता येईल. वेड या ब्लॉकबस्टर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्राचा लाडका सिनेमा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे याचा आनंद आहे. वेड सिनेमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला'.

'प्रेक्षकांचा लाडका सिनेमा आता घरबसल्या कुटुंबासोबत स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळणार आहे. थिएटर बाहेर ज्याप्रमाणे हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत होते तोच दिलखुलास प्रतिसाद वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला मिळेल याची मला खात्री आहे, असे रितेश पुढे म्हणाला.

निर्मात्या आणि लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील प्रेक्षकांना वेड सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहण्याचं आवाहन केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची गोष्ट पुन्हा एकदा अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, अशी भावना जिनिलिया देशमुख यांनी व्यक्त केली.

सतीश राजवाडे म्हणाले, ‘ वेड सिनेमा रसिकांसाठी हा चित्रपट नक्कीच पर्वणी ठरेल. सुपरस्टार रितेश देशमुख यांचं दिग्दर्शन आणि रितेश-जिनिलिया यांचा गुणी आणि सक्षम अभिनय प्रेक्षकांना पुन्हा एकदा घरबसल्या पाहायला मिळेल.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT