Riteish-Genelia Dances Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish-Genelia Dances Video : महाराष्ट्राचे दादा-वहिनी 'चिकनी चमेली'वर थिरकले, जबरदस्त डान्स पाहून नेटकरी म्हणाले...

Chikni Chameli Dances : बॉलिवूडचे पावर कपल महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी आपल्या मित्रांसोबत भन्नाट डान्स केला आहे. पाहा व्हिडिओ

Shreya Maskar

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया (Genelia ) हे बॉलिवूडमध्ये पावर कपल आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांना ओळखले जाते. दोघही एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करताना दिसतात. हे कपल सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि भन्नाट व्हिडिओ ते कायम शेअर करत राहते.

नुकताच रितेश देशमुख आणि जिनिलीया आपल्या सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. कमी वेळात या व्हिडिओवर लाखो लाईक्स आले आहेत. जिनिलीया आणि रितेश आपल्या मित्रांसोबत एक जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मिडिया टाकला आहे. या व्हिडिओत सर्वजण भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. यांनी 'चिकनी चमेली' या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. त्यांचे वेडेपण आणि धमाल मज्जा मस्ती व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे.

रितेश-जिनिलीयाच्या या जबरदस्त व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. लाखाच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे. 'वहिनी लय भारी', 'रितेश भाऊ कमाल' अशा असंख्य कमेंट्स नेटकी त्यांच्या डान्स व्हिडीओला देत आहेत.

रितेश देशमुख आणि जिनिलीया सोबत या व्हिडिओमध्ये आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख,जेनिफर विंगेट, कांची कौल आणि समिता बांगर्गी हे देखील 'चिकनी चमेली'वर थरकताना दिसत आहेत. 'अग्निपथ' चित्रपटातील कतरिना कैफचं 'चिकनी चमेली' हे गाण आहे. हा चित्रपट 2012 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या गाण्यावर कतरिनाने जबरदस्त ठुमके लगावले होते.

चाहते रितेश-जिनिलीयाच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिनिलीया 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अमीर खानसोबत दिसणार आहे. तर रितेश भाऊ 'हाऊसफुल्ल ५' दिसणार आहे. या चित्रपटात देखील तगडे सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT