Ambani family Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ambani family: अंबानींच्या घरी पसरली शोककळा; 'या' जिवलगाचा झाला मृत्यू!

Ambani family: आज महाराष्ट्र दिनी भारतातील श्रीमंत कुटुंब अंबानींच्या घरी शोककळा पसरली आहे. आज अंबानींच्या जिवलगाचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ambani family: आज महाराष्ट्र दिनी भारतातील श्रीमंत कुटुंब अंबानींच्या घरी शोककळा पसरली आहे. आज अंबानींच्या जिवलगाचा मृत्यू झाला आहे. या जिवलगाने राधिका आणि अनंतच्या साखरपुड्यात खास एंट्री करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. हा जिवलग म्हणजे अंबानी कुटुंबाच्या लाडक्या पाळीव कुत्रा, 'हॅपी'. अनंत अंबानी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हॅपी केवळ एक पाळीव प्राणी नव्हता, तर कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब शोकमग्न झाले आहे.​

हॅपीच्या मृत्यूनंतर अंबानी कुटुंबाने एक भावनिक संदेश शेअर केला आहे. त्यात त्यांनी हॅपीच्या आठवणी, त्याच्या प्रेमळ स्वभावाची आठवण आणि त्याच्या सहवासातील खास क्षणांचे वर्णन केले आहे. कुटुंबाने म्हटले आहे की, "हॅपीच्या रूपाने आम्हाला निस्वार्थ प्रेम, आनंद आणि निष्ठा अनुभवायला मिळाली."​

हॅपी हा अनंत अंबानींचा अत्यंत लाडका पाळीव प्राणी होता. अनंत अंबानी आपला मोकळा वेळ हॅपी सोबत घालवायचे. त्याच्या सहवासाने कुटुंबात आनंदाचे क्षण घालवले. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाने त्याच्या आठवणींना जपण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात त्याच्या नावाने एक स्मृती उद्यान उभारण्याचा विचारही आहे.​

अनंत यांचे प्राण्यांवर फार प्रेम आहे. देशभरातील जखमी वन्यजीवांवर उपचार करण्याच्या कामात ते नेहमीच सहभागी असतात. जगातील सर्वात मोठे प्राणी पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनताराचे अनंत अंबानी संस्थापक असून येथे २००० हून अधिक प्रजातींच्या १.५ लाख पशु-पक्षांना जीवनदान देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EMI चा हप्ता थकवलात तर फोन होणार लॉक? आरबीआय नवा नियम आणणार, VIDEO

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT