Richa-Ali Wedding Images Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa-Ali Wedding : रिचाच्या गालावर लग्नाची लाली; 'सुंदरा' कॅमेऱ्यात भरली...

रिचा आणि अलीने इंस्टाग्रामवर व्हॉईस नोट शेअर करून लग्नाची घोषणा केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत आहे. मेहेंदीपासून संगीतापर्यंतचे सर्व कार्यक्रम दिल्लीत साजरे करून दोघेही मुंबईत (Mumbai) परतले आहेत. रिचा आणि अली यांचा विवाह सोहळा मुंबईत होणार आहे. लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती असणार आहे. (Entertainment News Marathi)

लग्नासाठी (Wedding) मुंबईमध्ये आलेल्या रिचाला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. रिचा तेव्हा लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. नववधूच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो आला आहे. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत आहे. विमानतळावर रिचाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तिचे विमानतळावरील फोटो व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी रिचा आणि अलीने इंस्टाग्रामवर व्हॉईस नोट शेअर करून लग्नाची घोषणा केली होती. लग्नापूर्वीच्या सोहळ्यात 'फुक्रे' चित्रपटातील 'अंबरसारिया' आणि 'रांझा रांझा' या हिट गाण्यांवर दोघांनी डान्स सुद्धा केला. त्यांचे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

रिचा आणि अलीची 'फुक्रे'च्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते एकेमकांना डेट करत आहेत. लग्नानंतर 'फुक्रे ३'मध्ये सुद्धा दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; दरांडेंनी शिवीगाळ करत बाप काढल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Khan Sir : खान सरांच्या बॉडीगार्डनेचं केला कोचिंग सेंटरमध्ये गोळीबार? 'त्या' व्हिडिओने उडाली खळबळ

Walking after dinner: मासिक पाळी अनियमित आहे? रात्रीच्या जेवणानंतर १५ मिनिटं चालण्याची सवय ठरू शकते फायदेशीर

Famous Singer Death : जादुई आवाज हरपला! ज्येष्ठ गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT