Rhea Chakraborty  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty: 'एक फौजी की बेटी...'; रिया चक्रवर्तीचा भारतीय सैन्याला भावनिक सलाम

Rhea Chakraborty: भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Shruti Vilas Kadam

Rhea Chakraborty: भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर, रियाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट लिहिली आहे ज्यात तिने स्वतःला 'फौजीची मुलगी' म्हणून संबोधले आहे.

या पोस्टमध्ये रियाने लिहिले आहे, "एक सैनिकाची मुलगी म्हणून, मी माझ्या वडिलांना दुसऱ्या त्वचेसारखी युनिफॉर्म परिधान करताना पाहिले आहे आणि माझ्या आईला सैनिकासारखे अश्रू रोखताना पाहिले आहे. एक आर्मी ऑफिसरची मुलगी म्हणून, मला माहिती आहे की आज मी सुरक्षित झोपते कारण कुणाचे तरी वडील, आई, भाऊ आणि बहीण सीमारेषेवर तैनात आहेत."

तिने पुढे लिहिले आहे, "सर्व आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत, प्रार्थना करत आहेत की त्यांच्या घरातील सैनिक लवकरच घरी येतील. एका फौजीच्या घरातून दुसऱ्या घरापर्यंत, प्रेम, ताकद आणि सलाम. जय हिंद."

रिया चक्रवर्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टमुळे भारतीय सैन्याच्या कुटुंबीयांच्या भावना आणि त्यांचा त्याग समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT