Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात श्रेयस सावंत
मनोरंजन बातम्या

Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात

या वेळीच्या चित्ररथामधून झाडे लावा हा संदेश देण्यात आला आहे.

श्रेयस सावंत

श्रेयस सावंत

मुंबई : आजच्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीच्या राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळतात. यंदाही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा दिल्लीतील राजपथावर पहायला मिळाले आहे. यावेळी महाराष्ट्राची जैवविविधता (Biodiversity of Maharashtra) ही यंदाच्या चित्ररथाची वैशिष्ट्य आहेत. या चित्ररथावर महाराष्ट्र असे मध्यभागी लिहिण्यात आले होते. तसेच त्यावर भव्य ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराची 8 फूट उंचीची देखणी प्रतिकृती दाखवण्यात आली होती.

तर, या चित्ररथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध गायक सुदेश भोसले ( Singer Sudesh Bhosle) यांच्या आवाजातील चित्ररथाची कविता आहे. सुरुवातीला ही कविता हिंदीत रेकॉर्ड करण्यात आली होती त्यानंतर, सुदेश भोसले यांनी हिंदी आणि नंतर मराठीतही ती रेकॉर्ड केली आणि ती दिल्लीला पाठवली. तेव्हा महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी मराठीतील कविताच योग्य असल्याचे लक्षात घेऊन मराठी कवितेला परवानगी देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

या चित्ररथाबाबत सांगताना सुदेश भोसले म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून मला फोन आला होता. त्यांना मी लगेचच कवितेसाठी होकार दिला. 50 सेकंदांची ही कविता आहे. हा मला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे. मी आजपर्यंत अनेक कलाकारांना आवाज दिला तेव्हा जेवढा आनंद मला नाही झाला तेवढा आज झाला आहे. सुरुवातीला मला हिंदीत कविता लिहून देण्यात आली होती. मी हिंदीतील रेकॉर्डिंग त्यांना पाठवलं. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारसाठी मी मराठी कवितासुद्धा रेकॉर्ड करून पाठवली आहे. जेव्हा दिल्लीमध्ये या दोन्ही कविता ऐकल्या गेल्या, तेव्हा त्यांनी मराठी कविता निवडली."

महाराष्ट्र्राचा चित्ररथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT