Suraj Chavan  Saam tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ! 'गुलिगत' फेम सूरज चव्हाण दिवसाला किती कमावतो? 'बिग बॉस' मराठीच्या घरात केला मोठा खुलासा

Reels star Suraj Chavan income : सूरज चव्हाण दिवसाला किती कमावतो? याविषयी त्याने स्वत:नेच मोठा खुलासा केला आहे. 'बिग बॉस' मराठीच्या घरात त्याने याविषयी खुलासा केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : बिग बॉस मराठीचा नवा सिझन सुरु झाला आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये १६ स्पर्धकांनी जोरदाह एन्ट्री मारली आहे. या १६ स्पर्धकांमध्ये 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणचाही समावेश आहे. सूरज चव्हाणच्या एन्ट्रीने सर्व चकीत झाले आहेत. सूरजचे इन्स्टाग्राम रील्स प्रचंड चर्चेत असतात. सूरज चव्हाणने हळहळू 'बिग बॉस' मराठीच्या घरातील लोकांचे मने जिंकायला सुरुवात केली आहे. सूरजने घरातील सदस्यांशी बोलताना दिवसाला किती कमाई करतो, याविषयी मोठा खुलासा केला आहे.

'बिग बॉस' मराठीच्या घरातील काही सदस्य एकत्र गप्पा मारत होते. त्यामध्ये सूरज चव्हाण देखील होता. योगिता चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत आणि घरातील इतर सदस्यांशी त्याने संवाद साधला. यावेळी सूरजने त्याच्या कमाईविषयी मोठा खुलासा केला. 'मी दिवसाला ८० हजारांची कमाई करतो', असं सूरजने सांगितले. सूरजने कमाई सांगितल्यावर घरातील सर्वच चकीत झाले. सूरज चव्हाण हा व्हिडिओ आणि युट्यूबच्या माध्यमांतून ८० हजारांची कमाई करतो. सूरजने त्याची कमाई सांगितल्यानंतर सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

सूरज नेमकं काय म्हणाला?

सूरजने मनमोकळं करत घरातील सदस्यांना सर्वच सांगितलं. 'आपल्याला लोकांनी खूप लुटल्याचं बहिणी सांगतात. तू सुधर आणि लोकांची उधारी पूर्ण करून टाक. तू यशस्वी झाल्यास खूप आनंद होईल. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसाला ८० हजार रुपये मिळायचे. मला लोक अनेक ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवायचे. मला फक्त रिबीन कापायचे हजारो रुपये मिळायचे. टिक टॉकच्या काळात हे पैसे मिळायचे. आता मला ३०००० ते ५०००० रुपये मिळतात, असा खुलासा सूरजने केला.

कोण आहे सूरज चव्हाण?

पुणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहणारा सूरज चव्हाण टिक टॉकमुळे घराघरात पोहोचला. सूरजचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. लोकांना पोट धरून हसवणारा सूरज चव्हाण 'बिग बॉस' मराठी घरात राडा घालायला सज्ज झाला आहे. बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण हा थोडा गप्प गप्प दिसत आहे. मात्र, घरातील सदस्यांचं मनोरंजन करण्याची कसरही सोडत नाही. या स्पर्धेत सूरज चव्हाण चांगल्या पद्धतीने खेळायला सुरुवात करेल, अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT