Hardik Joshi Angry On Mukta Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jau Bai Gavat: रागाच्या भरात मुक्ता गाव सोडणार...; 'जाऊ बाई गावात'मध्ये हार्दिकनं घेतली मुक्ताची शाळा

Hardik Joshi Angry On Mukta: गावातील ग्रामस्थांची दैनंदिन कामं या मुलींना जमणार की नाही? हे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Hardik Joshi Show:

झी मराठीवरील अभिनेता हार्दिक जोशीच्या (Hardik Joshi) 'जाऊ बाई गावात'या शोची (Jau Bai Gavat Show) सध्या चांगलीच चर्चा होत आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरामध्ये आलिशान घरामध्ये राहणाऱ्या आणि ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या मुली गावामध्ये राहत असल्याचे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. या शोमध्ये या सर्व मुलींना वेगवेगळे टास्क देण्यात आले आहेत.

गावामध्ये राहून गावचे जीवन जगणे त्यांच्यासाठी कठीण आहे तरी देखील त्या प्रयत्न करत आहेत. गावातील ग्रामस्थांची दैनंदिन कामं या मुलींना जमणार की नाही? हे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या शोमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली कंटेस्टंट मुक्ता 'जाऊ बाई गावात'मध्ये राहणाऱ्या आजीवर रागावते आणि त्यांच्यावर आवाज चढवते. त्यानंतर हार्दिक जोशी यावरून संतप्त होत तिची चांगलीच शाळा घेतो हे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. चूक असताना देखील मुक्ता ही हार्दिक जोशीसोबत देखील उद्धटपणाने बोलते. त्यानंतर ती मीच हा शो सोडून जाते असं म्हणत रागाच्या भरात तिथून निघून जाते.

'जाऊ बाई गावात' या शोच्या नुकताच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये दिसले की, मुक्ताला झोपेतून उठवण्यासाठी एक आजी येतात. त्या आजींवर मुक्ता जोराने ओरडते. त्या आजींना ती म्हणते, 'मला हात लावू नका.' मुक्ताचे हे वागणं हार्दिक जोशीला खटकते आणि तो संतप्त होतो. हार्दिक तिला तू असं का वागली? असं विचारतो त्यावर ती उद्धटपणे उत्तर देऊ लागते. हार्दिक म्हणतो की तू आज सकाळी आजीला काय म्हणाली?'

हार्दिकच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुक्ता हसते. त्यामुळे हार्दिक रागावतो आणि म्हणतो, 'यात हसण्यासारखं काही नाहीये. बोलताना जरा विचार करुन बोलत जा. आपण कोणाशी बोलतो? काय बोलतो? याचा विचार कर. वयाचं जरा भान ठेवत जा. ती तुझी आजी जरी नसली तरी ती कोणाची तरी आजी आहे, कोणाची तरी आई आहे. हे कायम लक्षात ठेव. फक्त तिच्यासोबतच नाही तर कोणत्याही गावकऱ्याशी बोसताना आदबीनं बोलायचं. मी या शोचा अँकर म्हणून तुमच्यासोबत हे बोलत आहे.'

त्यानंतर हार्दिकला मुक्ता म्हणते आजी जे वागली ते घरगुती हिंसाचार आहे. त्यावर हार्दिक घरातील इतर स्पर्धकांना विचारतो खरंच तुम्हाला देखील हा घरगुती हिंसाचार वाटतो का? तर इतर कंटेस्टंट सरळ नाही म्हणून सांगतात. त्यानंतर मुक्ता हार्दिकला म्हणते तुम्हाला तुमचंच खर करायचे आहे मीच गाव सोडून जाते. असं म्हणत ती तिथून निघून जाते. आता खरंच मुक्ता गाव सोडून जाते की नाही? हे हा एपिसोड आल्यानंतरच कळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT