Raveena Tandon Reacts On Trolling After she Received Padma Shree  Instagram @officialraveenatandon
मनोरंजन बातम्या

Raveena Tandon Reaction: तुम्हाला फक्त झगमगाट दिसतो..., पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर ट्रोल झालेल्या रवीनाने नेटकऱ्यांना सुनावले

Raveena Tandon Get Trolled: रवीनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Pooja Dange

Raveena Tandon Reacts On Trolling: अभिनेत्री रवीना टंडनने 90 च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवली होती. रवीनाने चित्रपटामध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांची माने जिकंली. अभिनेत्री रवीना टंडन आजही तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

रवीनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रवीनाचे चाहते तिच्या या कामगिरीवर खूप खूश होते, तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले होते. रवीनाला पद्मश्री मिळाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, आता अभिनेत्रीने मौन सोडत ट्रोल्सची बोलती बंद केली आहे.

रवीना टंडनने ट्रोल्सना चांगला धडा शिकवला आहे, 'मी त्यांना महत्त्व देऊ इच्छित नाही कारण त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे. काही लोकांच्या कमेंट्स ज्यांचे फक्त 20 फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी मी केलेले काम पाहिलेले नाही, या लोकांच्या कमेंट्समुळे माझ्या कामातील योगदान कमी होणार नाही.

ट्रोल्सना फक्त ग्लॅमर दिसतो, त्यांना आमची मेहनत आणि आम्ही दिलेला वेळ दिसत नाही. आज सोशल मीडियावर अशा गोष्टी आहेत हे आम्हाला माहीत आहे, पण ज्यांनी मला शुभेच्छा पाठवल्या त्यांचे आभार.'

रवीना टंडन पुढे म्हणाली, 'मला प्रकर्षाने जाणवणाऱ्या मुद्द्यांवर चित्रपट करण्याचा मी प्रयत्न केला. निर्भया प्रकरणाने मला खूप हादरवले. मी असे अनेक चित्रपट केले ज्यात महिलांवरील हिंसाचार आणि महिला सक्षमीकरणावर भाष्य केले. मला व्यावसायिक सिनेमा आवडतो, पण समाजात बदल घडवून आणणाऱ्या प्रकल्पांवरही माझा भर असतो.

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने पद्मश्री पुरस्कार स्वीकरल्यानंतर आनंद व्यक्त केला होता. राशाने लिहिले, 'पद्मश्री पुरस्कार, भारतीय प्रजासत्ताकातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक. हे वर्ष तुझ्यासाठी खास आहे. तुम्ही नेहमी म्हणता की हे सर्व आजोबांमुळेच आहे, तुला जे मिळत आहे ते मिळवण्यासाठी ते तुला मदत करत आहेत. मला याबाबत शंका नाही. पण, यात तुझीही मेहनत आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT