Rashmika Mandanna Saam TV
मनोरंजन बातम्या

शॉर्टड्रेसमुळं 'पुष्पा'ची 'श्रीवल्ली' झाली Oops Momentची शिकार; व्हिडिओ व्हायरल

Shivani Tichkule

Rashmika Mandanna Oops Moment: ‘पुष्पा’ या चित्रपटाने हिंदी प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झालेली साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात पोहोचली, जिथे तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रेड कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान करून पुष्पाची श्रीवल्ली जेव्हा रेड कार्पेटवर दाखल झाली तेव्हा सगळेच थक्क झाले. यावेळी रश्मिकाने खूप छोटा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती, अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिला टोमणेही मारायला सुरुवात केली की, जर ती या आउटफिटमध्ये इतकी अस्वस्थ होती तर मग तिने असे कपडे का घातले? मात्र, रश्मिकाची ओप्स मोमेंटची शिकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

पण यावेळी रश्मिकाने सर्वांची मने जिंकली जेव्हा तिने मीडिया फोटोग्राफर्सच्या विनंतीवरून सर्वांसोबत फोटोसाठी पोज दिली, त्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सर्व फोटोग्राफर रश्मिकासोबत फोटो काढण्याची विनंती करतात, अशा परिस्थितीत ती नकार देऊ शकत नाही आणि ग्रुप फोटो काढण्यास तयार होते. मात्र, यादरम्यान ती तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे थोडी अस्वस्थ दिसत आहे.

रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

या व्हिडीओवर कमेंट करत चाहते रश्मिका मंदान्नाच्या हसण्याचं आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, तुझे हास्य हृदयाला स्पर्श करते. एका चाहत्याने लिहिले की, तू खरोखर गोंडस आहे. त्याचवेळी काही यूजर्स रश्मिकाच्या आउटफिटबद्दल कमेंट करतानाही दिसले. तिच्या चाहत्यांना लवकरच रश्मिका बॉलीवूड चित्रपटांमध्येही पाहायला मिळणार आहे. रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलीवूड पदार्पण करणार आहे. मिशन मजनू असे या चित्रपटाचे नाव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या, निगडी परिसरात खळबळ

VIDEO : महायुतीचं रिपोर्ट कार्ड; अडीच वर्षांतील कामाचा दिला लेखाजोखा

Maharashtra News Live Updates : संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

World food day: तुम्हाला माहितीये का फूड एलर्जी आणि फूड इंटोलेरेंसमधील नेमका फरक? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

Kojagiri Purnima Milk : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्याघरी बनवा मसाला दूध; वाचा सिंपल आणि परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT