Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Wedding Muhurt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding : लगीन घटिका समीप आली! रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात; पाहा शाही लग्नाचा मुहूर्त कधीचा?

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Wedding Muhurt : साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने आज म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत. ‘प्राइमल’ थीम असलेल्या या खास लग्नसोहळ्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते.

Alisha Khedekar

  • रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा उदयपूरमध्ये विवाहबद्ध

  • आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार विधी

  • ‘प्राइमल’ थीममधील साधा पण शाही लग्नसोहळा

  • तेलुगू आणि कोडावा परंपरेनुसार दोन वेगळे विधी

सध्या देशात एका लग्नाची जोरदार चर्चा रंगलीय, ते लग्न म्हणजे, साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा. दोघेही आज म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर इथे लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नासोहळ्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. सध्या रश्मिका आणि विजय यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या लग्नाची थीम 'प्राइमल' असणार आहे. पारंपरिक आणि अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे.

लग्नाची थीम 'प्राइमल'

विजय देवरकोंडा आणि रश्मिका या सुपरस्टार जोडीच्या लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. लग्नाचे ठिकाण राजेशाही आहे आणि लग्नाच्या थीमपासून ते स्टाईलपर्यंत सर्व काही साधे आणि स्टायलिश असणार आहे. विजय देवरकोंडाने त्याच्या इंस्टाग्रामवर याची एक झलक देखील शेअर केली आहे.

दोन पारंपरिक पद्धतीत लग्न पार पडणार

तेलुगू आणि कोडावा या दोन्ही संस्कृतींचा आदर करत दोन वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे 'विरोश' यांचे विधी पार पडणार आहेत. 'विरोश' यांच्या लग्नाच्या विधींची सुरुवात विजय देवरकोंडाच्या पारंपारिक तेलुगू हिंदू विधींनुसार होणार आहे. हा सोहळा सकाळी ८ वाजता सुरु होईल. त्यानंतर संध्याकाळी कोडावा समारंभ होईल, ज्यामध्ये रश्मिका मंदानाच्या कुटुंबियांच्या परंपरेने चालत आलेल्या विधी होणार आहेत.

विजय आणि रश्मिकाचा प्रवास २०१८ मध्ये गीता गोविंदम या रोमँटिक ड्रामाच्या सेटवर सुरू झाला, जो बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. चित्रपटाच्या यशामुळे ते तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक बनले. त्यानंतर ही जोडी 'डिअर कॉम्रेड' साठी पुन्हा एकत्र दिसली. ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांच्या अभिनयाने करोडो चाहत्यांची मने जिंकली. अशा या जोडीचे आज मोठ्या थाटामाटात उदयपूर येथे लग्नसोहळा पार पडतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT