Rashmika-Vijay Sangeet saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Sangeet : एकमेकांच्या मिठीत हरवले रश्मिका-विजय; VIROSH चा रोमँटिक डान्स पाहिलात का? संगीत सोहळ्याचे फोटो आले समोर

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Sangeet Ceremony : रश्मिका आणि विजयच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये रश्मिका आणि विजयचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाह सोहळा पार पडला.

रश्मिका आणि विजय यांचे संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले आहे.

रश्मिका आणि विजयचा रोमँटिक अंदाज पाहून चाहते भारावून गेले.

साऊथचे पावर कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी संगीत सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे सध्या तुफान व्हायरल होतना दिसत आहे. रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांचा लग्न सोहळा कुटुंब आणि जवळचा मित्र परिवार यांच्यात थाटामाटात साजरा झाला. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या संगीत सोहळ्यात त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांनी ही खास कॅप्शन देऊन संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

विजय देवरकोंडा पोस्ट

"२४.०२.२६

आमची संगीत नाइट.

त्या संध्याकाळी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो, पाय दुखेपर्यंत नाचलो, सर्वांची भाषणे ऐकून भावनिक झालो...

सुंदर लोकांनी भरलेली एक मोठी आनंदी पार्टी..."

रश्मिका मंदाना पोस्ट

"प्रेम, आनंदाचे अश्रू, हास्य, संगीत, गाणे, चमक आणि आम्ही रात्रभर नाचत राहिलो...

ती खरोखरच आतापर्यंतची सर्वात मजेदार रात्र होती...

विज्जू आणि मला एकमेकांना सरप्राइज द्यायचे होते, कुटुंबाला आम्हा दोघांना सरप्राइज करायचे होते...

आमच्या कुटुंबांना इतके चांगले नाचताना पाहून उत्साहित आणि आश्चर्यचकित झालो..

२४.२.२६!

विजय आणि मी आमच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या प्रेमाने वेढलो आणि खूप नाचलो..."

संगीत सोहळ्याच्या फोटोंमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र नाचताना दिसत आहे. त्यांचे कुटुंब, मित्र परिवार एकत्र आनंद साजरा करत आहे. रश्मिका-विजयच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत आहे. विजय रश्मिकाला मिठी मारतो, उचलून घेतो. दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसत आहे. तसेच दोघांच्या संगीत सोहळ्यातील ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रश्मिकाने चंदेरी रंगाची शिमरी लेहेंगा परिधान केला होता. तर विजयने निळ्या रंगाची शाही शेरवानी परिधान केली. दोघे एकत्र खूपच सुंदर, आनंदी दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT