Badshah SAAM TV
मनोरंजन बातम्या

Badshah : रॅपर बादशाहचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; इतकं किलो वजन घटवलं, VIDEO पाहून ओळखणंही झालं कठीण

Badshah Weight Loss :रॅपर बादशाहने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्यांनी आपले वजन कमी केले आहे. बादशाहच्या नवीन लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूडचा रॅपर बादशाह (Badshah ) त्याच्या उत्तम गाण्यासाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक हटके रॅप केले आहेत. त्याच्या रॅपचे तर चाहते दिवाने आहेत. तो नेहमी नवीन काहीतरी चाहत्यांसाठी घेऊन येत असतो. मात्र सध्या रॅपर बादशाह एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्यांनी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

बादशाहच्या अनोख्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बादशाहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून चाहते चकित झाले आहेत. बादशाह आपले वजन कमी (Weight Loss) केले आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बादशाहने शेअर केलेला व्हिडीओ कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीचा असला तरी नेटकऱ्यांची नजर कमी झालेल्या बादशाहच्या वजनावर पहिली गेली आहे. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. व्हिडीओमध्ये बादशाह एकदम फिट आणि हॅन्डसम दिसत आहे. त्याने वजन कमी करून चाहत्यांना धक्का दिला आहे.

व्हिडीओमध्ये तो जिममध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर दोन्ही कमेंट्स येत आहेत. काही युजर कमेंट करून त्याच्या लूकची तारीफ करत आहेत. तर काही लोक त्याला ट्रोल देखील करत आहे. एक युजर कमेंट करत लिहितो की, "खूप देखणा दिसतोस" तर दुसरा युजर बोलतो की, "हनी सिंगच्या परत येण्याच्या भीतीने बादशाहने जेवण बंद केले होते." तर तिसऱ्या युजरने बादशाहची तुलना एपी ढिल्लनशी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT