Ranveer Deepika Dream Home: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग सध्या कोणत्याही चित्रपटात नाही. हे बॉलिवूडचं क्यूट कपल नुकतंच त्यांच्या नवीन घरामुळे सोशल मीडियावर चर्चेत दिसत आहे. दीपिका आणि रणवीर सोबत त्यांचे आई- वडिल देखील दिसत आहेत. सध्या त्यांच्या नव्या घराची चर्चा सोशल मीडियावर रंगत असून त्यांचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत रणवीर सिंगचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांना दिसला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही सेलिब्रेटी याच वर्षी त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. त्यांचं हे नवं घर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मन्नत जवळच आहे. त्यामुळे ती गोष्ट त्यांच्यासाठी खास आहे. काही करुन आपल्याला शाहरुखचे शेजारी व्हायचं ही त्यांची इच्छा होती. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींचे कौतुक केले आहे. नुकतंच रणवीर- दिपीकाने आपल्या नव्या घराच्या बांधकामाची पाहणी केली, त्यावेळचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
यावेळी दीपिका ऑल-ब्लॅक कॅज्युअल टॉपमध्ये दिसली, तर रणवीरने ब्लॅक मास्क लावून आणि वेगळी हेयरस्टाईल करत त्याने सर्वांनाच चकवा दिला. या कपलसोबत रणवीरचे आई-वडीलही दिसले. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, दीपिका-रणवीरने सागर रेशम या बँडस्टँड इमारतीच्या १६, १७, १८ आणि १९ मजल्यावर नवीन घर खरेदी केले आहे. त्याची किंमत ११९ कोटी रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोळाव्या मजल्यावर दीपिकाचं चार बीएचके घर आहे तर, १७ ते १९ मजल्यापर्यंत पेंट हाऊसचे काम सुरु आहे. दीपिका- रणवीरच्या घराबाजूलाच शाहरूखचा मन्नत बंगला आहे. (Entertainment News)
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत, एक नेटकरी म्हणतो, आता तुम्ही शाहरुखचे शेजारी झालात. अभिनंदन. तर आणखी एक म्हणतो, तुम्ही काहीही करा, पण एसआरके इतके फॅन्स काही तुम्हाला मिळणार नाहीत की ते तुमच्या घराबाहेर जमणारही नाहीत. तर आणखी एक युजर म्हणतो, शेवटी शाहरुखपासून दीपिकाला जास्त वेळ लांब राहता आले नाही हेच खरं. अशा भन्नाट कमेंटस नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडीओवर केल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.