Mrs Chatterjee vs Norway review @Saam TV
मनोरंजन बातम्या

'Mrs Chatterjee Vs Norway' review: राणी मुखर्जीच्या नव्या चित्रपटावर काय आहे चित्रपटप्रेमींची प्रतिक्रिया, Review जाणून घेण्यासाठी नक्की वाचा

Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीचा बहुचर्चित चित्रपट 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

Mrs Chatterjee vs Norway Released: राणी मुखर्जीचा बहुचर्चित चित्रपट 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कलकत्ता येथील एका बंगाली जोडप्याच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीने दमदार अभिनय केला आहे.

या चित्रपटातील राणीच्या अभिनयाशिवाय लोकांना चित्रपटाची कथाही खूप आवडली आहे. या चित्रपटावर शाहरुख खान, काजोल, जॉन अब्राहम व्यतिरिक्त अनेक स्टार्स प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकही अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

असिमा छिब्बर दिग्दर्शित हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा चित्रपट एका आईच्या जीवनावर आधारित आहे जी आपल्या मुलांचा ताबा मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार असते. या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीशिवाय नीना गुप्ता, जिम सरभ आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सागरिका चक्रवर्तीचे आत्मचरित्र 'द जर्नी ऑफ अ मदर'वर आधारित आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे जो प्रेक्षकांना खूप पसंतीस पसंत आहे. या चित्रपटाबद्दल एका यूजरने लिहिले की, 'मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे, राणीने तिच्या अभिनयाने या चित्रपटाला जीवदान दिले असेल'. दुसर्‍याने लिहिले, 'आई आणि मुलाच्या भावनेवर बनलेला हा सर्वात शक्तिशाली चित्रपट आहे. यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी नक्कीच जिंकणार आहे.

दुसरा युजरने म्हटले आहे, 'भावनिक, आकर्षक आणि प्रेरणादायी. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे हा असा चित्रपट आहे, ज्याचे कौतुक केले पाहिजे जेणेकरून असे आणखी चित्रपट बनवले जातील. राणी मुखर्जीने पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे अप्रतिम अभिनय केला आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, 'हा एक थरारक चित्रपट आहे. ही कथा सर्वांपर्यंत पोचविण्याची गरज आहे, मी राणी मुखर्जीच्या अभिनयाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे.

राणी मुखर्जीचा हा चित्रपट एका भारतीय महिला आणि तिच्या पतीच्या आयुष्यावरील खऱ्या कथेवरून प्रेरित आहे, ज्यांना नॉर्वेमध्ये त्यांच्या मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागला होता. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचाच धक्का दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

SCROLL FOR NEXT