Animal 3rd Day Box Office Collection Twitter
मनोरंजन बातम्या

Animal 3rd Day Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीरचं राज्य; ‘ॲनिमल’ने तीन दिवसांतच गाठला २०० कोटींचा टप्पा

Animal Box Office Collection: रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.

Chetan Bodke

Animal 3rd Day Box Office Collection

‘ॲनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. सध्या ह्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरु आहे. नुकताच १ डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला आहे.

पहिल्या दिवसापासूनच अनेक चित्रपटांची रेकॉर्डब्रेक कमाई करत ह्या चित्रपटाने आपल्या नावावर रेकॉर्ड तयार केला आहे. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाने तिसऱ्या किती कमाई केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, अनेक सेलिब्रिटींकडूनही आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दमदार ॲक्शन, उत्तम कथा, अफलातून व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय असा मिलाप असलेल्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. (Bollywood)

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. पहिल्या दिवशी ६३ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ६६.२७ कोटी तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ७२. ५० कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवसाचा कमाई आकडा पाहता चित्रपटाने रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए रेटिंग मिळाली असली तरी, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. (Bollywood Film)

१ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’सोबत ‘सॅम बहादूर’ सुद्धा रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तीन दिवसामध्ये, २५. ५० कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी ६. २५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९ कोटी, तर तिसऱ्या दिवशी १०. ३० कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाची निर्मिती ५५ कोटींमध्ये झाली असून दिग्दर्शकांसह निर्मात्यांनी चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटामध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी सारखे प्रतिभावान कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT