Ramayana Box Office 
मनोरंजन बातम्या

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

Ramayana Collection: रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवसांत जगभरात ५२४ कोटींचा टप्पा पार केला आहे.

Shruti Vilas Kadam

Ramayana Collection: बॉक्स ऑफिसवर सध्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा या चित्रपटाला चांगलाच झाला असून, प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या विकेंडमध्ये दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटाने सोमवारची परीक्षाही यशस्वीपणे पार केली आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनानंतर अवघ्या पाच दिवसांत 'रामायण'ने जगभरात ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड करत आहे.

सॅकनिल्क (Sacnilk) च्या अहवालानुसार, ‘रामायण’ चित्रपटाने भारतात पाचव्या दिवशी १०७.५० कोटी रुपयांची कमाई केली असून, यासाठी एकूण २३,९११ शोज बुक करण्यात आले होते. परिणामी, या चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ४१३.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर नेट कमाई ३४६.३५ कोटी रुपये इतकी झाली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने ६६३.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘रामायण’ने विविध भाषांमध्ये किती कमाई केली?

पाचव्या दिवशी, केवळ हिंदी व्हर्जनने ८७.२५ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यासाठी १९,००० हून अधिक शोज बुक झाले होते. याव्यतिरिक्त, चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनने ७.५० कोटी, तेलुगू आवृत्तीने ६ कोटी, तमिळ व्हर्जनने ४ कोटी आणि मल्याळम व्हर्जनने २.७५ कोटी रुपयांची कमाई केली. एका दिवसात १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा ‘रामायण’ हा ‘धुरंधर २’ नंतरचा दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

१० चित्रपटांना मागे टाकले

या हिंदी चित्रपटाने आपापल्या पाचव्या दिवशी ‘रामायण’पेक्षा कमी कमाई केली होती. सध्या या यादीत रणबीर कपूरचा चित्रपट टॉप आहे

1 रामायण 87.25 कोटी

2 धुरंधर 2 60 कोटी

3 पठाण 58.50 कोटी

4 गदर 2 55.40 कोटी

5 पुष्पा 2 46.40 कोटी

6 सुलतान 38.21 कोटी

7 स्त्री 2 38.10 कोटी

8 वॉर 36.10 कोटी

9 ॲनिमल 34.02 कोटी

10 जवान 30.50 कोटी

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 64.85 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी 48.05 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.80 कोटी आणि चौथ्या दिवशी 56.15 कोटींची कमाई झाली. आता पाचव्या दिवशी, या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

रणबीर कपूरपासून यशपर्यंत कलाकारांची फौज

'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे.याशिवाय अभिनेत्री काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग शूर्पणखेची भूमिका साकारणार आहे. तर विवेक ओबेरॉय देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Burn First Aid : दिवाळीत भाजल्यावर बर्फ, टूथपेस्ट लावता? ही चूक करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला वाचा

Maharashtra News Live Update: गिरगाव चौपाटीवर छटपूजेला न्यायालयाचा नकार

गोकुळमधील २५ वर्षांची 'महाडिक सत्ता' संपली? यंदा त्या पॅटर्नला ब्रेक, अध्यक्षपदासाठी ४ नावं चर्चेत; कुणाची लागणार वर्णी?

Shocking: २ महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीनिमित्त घरी आले; घरात आढळले शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह

SCROLL FOR NEXT