Animal Teaser Date Declared Instagram/ @animalthefilm
मनोरंजन बातम्या

Animal Movie Teaser Date: रणबीर कपूरच्या नव्या लूकने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, अभिनेत्याने शेअर केलेला फोटो व्हायरल

Animal Teaser Update: अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

Chetan Bodke

Animal Movie Teaser Date Declared

सध्या रणबीर कपूर त्याच्या बहुचर्चित ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. रणबीर ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर ‘ॲनिमल’ (Animal) मध्ये झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत सातत्याने बदल होताना दिसत आहे. अखेर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १ डिसेंबर ठरवली आहे. येत्या २८ सप्टेंबरला अर्थात अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता दिसून येत आहे. अवघ्या काही वेळापूर्वी, अभिनेता रणबीरने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. नवा पोस्टर शेअर करताना, अभिनेत्याने चित्रपटाच्या टीझरची डेट देखील जाहीर केली आहे. त्याच्या वाढदिवशी ‘ॲनिमल’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाविषयी प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष देऊन आहेत. रणबीर कपूरसह चित्रपटामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

रणबीरने शेअर केलेल्या पोस्टरबद्दल बोलायचे तर, या पोस्टरवर अभिनेत्याचा राऊडी लूक दिसत आहे. त्याच्या डोळ्याला गॉगल दिसत असून अभिनेत्याच्या तोंडात सिगारेटही पाहायला मिळत आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या बॉसी लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरबरोबर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठी माहितीसमोर आली आहे. चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajasthan Plane Crash: राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच

Mumbai Rain : गरज असल्यासच घराबाहेर पडा; मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज |VIDEO

Caffeine Skin Effects : कॉफी प्यायल्याने स्कीन खराब होते का?

Car Models: 'या' कार मॉडेल्स डोंगराळ रस्त्यांवरही देतात जबरदस्त परफॉर्मन्स, किंमत स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी

SCROLL FOR NEXT