Ranbir is seen dancing to the song of his upcoming film Shamshera Ji Hazoor with his mother Neetu Kapoor  Saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO: रणबीर कपूर आई नीतू कपूरसोबत 'जी हुजूर' वर नाचताना दिसला, वाणी आणि मर्झीनेही दिली साथ!

रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर त्याची आई नीतू कपूर आणि वाणीसोबत त्यांच्या आगामी 'शमशेरा' 'जी हुजूर' चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर(Ranbir kapoor) आणि अभिनेत्री वाणी कपूर(Vaani kapoor) सध्या त्यांच्या आगामी 'शमशेरा'(shamshera) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. लवकरच दोघेही अभिनेत्री नीतू कपूर, कोरिओग्राफर मर्झी पेस्टोनजी आणि नोरा फतेही यांच्या 'डान्स दीवाने ज्युनियर' या लहान मुलांच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये रणबीर-वाणी उपस्थित राहणार आहेत.

डान्स रिअॅलिटी शोच्या जज नीतू कपूर यांनी मुलगा रणबीर कपूर शोच्या ग्रँड फिनालेमध्ये येणार म्हणून आपली उत्सुकता व्यक्त केली. आपला मुलगा रणबीर शोमध्ये सामील झाल्याची माहिती त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर शेअर करून दिली. यासोबत नीतू यांनी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत, 'शमशेरा इन द हाऊस'. असे कॅप्शन लिहिले आहे.

नीतू कपूरसोबत फोटो काढताना रणबीरने इंडो-वेस्टर्न ब्लॅक प्रिंटेड आउटफिट परिधान केलं आहे. तर दुसरीकडे, वाणी कपूर तिच्या चमकदार गुलाबी ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत होती. त्याचबरोबर नीतू सिंह निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.

नीतूने तिच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा मुलगा रणबीरसोबत 'जी हुजूर' गाण्यावर नाचताना दिसत आहे. या दोघांशिवाय वाणी आणि मर्झीही स्टेजवर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओसोबतच, नीतू कपूर यांनी रणबीर, वाणी आणि मर्झी पेस्टनजी यांच्यासोबत ग्रुप सेल्फी शेअर केला आहे.

'डान्स दिवाने ज्युनियर' हा शो अंतिम टप्प्यात आहे. या शोचे शेवटचे भाग १६ आणि १७ जुलै रोजी प्रसारित होणार आहेत. या शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या शोचा विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT