Ramayana Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Ramayana The Legend of Prince Rama Re-Release : भगवान रामावर आधारित 31 वर्षांपूर्वी बनवलेला चित्रपट 'रामायण' पुन्हा प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने याची वाट पाहत आहेत. प्रदर्शिनाची तारीख जाणून घ्या.

Shreya Maskar

भगवान रामावर आधारित 'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' (Ramayana The Legend of Prince Rama) हा चित्रपट लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा ॲनिम चित्रपट पहिल्यांदा 1993 साली प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 31 वर्षे पूर्ण झाली आहेत.

'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' हा चित्रपट 18 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी या भांषामध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पहिल्यांदा 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट भारत (India ) -जपान (Japan) यांनी एकत्र मिळून तयार केला आहे. हा चित्रपट रामायणाचा सुंदर नमुना आहे. रामायण हे पहिले महाकाव्य आहे. गीक पिक्चर्स इंडियाने अलीकडेच चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर अनावरण केले आहे. हा टीझर पाहून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा' हा चित्रपट भारत-जपान यांनी एकत्र मिळून बनवला आहे. हा चित्रपट कोची सासाकी आणि राम मोहन यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाला संगीत वनराज भाटिया यांनी दिले आहे. या चित्रपटाची कथा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या राम यांच्यावर आधारित आहे. हा चित्रपट लहान मुलांसाठी खास मेजवानी असणार आहे. चित्रपटातून त्यांना जवळून रामायण अनुभवता येणार आहे. सध्या अनेक चित्रपट री-रिलीज होत आहेत. यात आता 'रामायण' चित्रपटाचा समावेश झाला आहे. हा चित्रपट किती कमाई करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT