Ramayana Movie saam tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरमधील यशच्या 'त्या' सीनची तुफान चर्चा; प्रेक्षक करतायत भरभरून कौतुक, वाचा रिव्ह्यू

Ramayana Movie Public Review : 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू जाणून घेऊयात. प्रेक्षक रावणाच्या भूमिकेत असलेल्या यशचे भरभरून कौतुक करत आहेत.

Shreya Maskar

'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर ब्रह्म मुहूर्तावर रिलीज

ट्रेलरमधील एक सीन चाहत्यांना भलताच आवडला

यशच्या अभिनयाचे होतंय कौतुक

आज (३० जुलै) ब्रह्म मुहूर्तावर रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'रामायण'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर नेटकरी कमेंट्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहे. सर्वत्र फक्त रावणाची भूमिका करत असलेल्या साऊथ सुपरस्टार यशची चर्चा रंगली आहे. 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या भव्य ४ मिनिटे १० सेकंदांच्या ट्रेलरमधील प्रत्येक फ्रेम पाहण्यासारखी आहे, पण सुपरस्टार यशने साकारलेल्या रावणाच्या एका विशिष्ट दृश्याने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला आहे.

'रामायण'च्या ट्रेलरमध्ये यश (रावण) ची अनेक दमदार दृश्ये आहेत. मात्र एका दृश्यात, रावण एकाच गर्जनेने एका क्रूर सिंहाला शांत करताना दिसतो. हे दृश्य पाहून चाहत्यांचा थरकाप उडला आहे. नेटकरी या दृश्याचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं की, "यशचा जन्मच अशा भूमिकांसाठी झाला आहे...", दुसऱ्या युजरने लिहिलं की, "हे एकच दृश्य सर्व काही सांगून जाते...", तिसऱ्या युजरने लिहिलं की, "यशने चित्रपटाला सुपहिट केले आहे..." तसेच "यशची ॲक्शन खूपच भारी आहे...", "चित्रपट कधी पाहतोय असे झाले आहे..." अशा अनेक कमेंटस येत आहे.

यशला रावणाच्या रुपात पाहून काहींना 'तान्हाजी' चित्रपटातील सैफ अली खान (उदयभान सिंग राठोड) ची आठवण आली. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सर्वत्र यशचा बोलबाला पाहायला मिळत आहे. तसेच नेटकरी 'रामायण'मधील VFX चे कौतुक करत आहेत. मात्र दुसरीकडे ट्रेलरमध्ये हनुमानाची भूमिका दिसली नाही म्हणून प्रेक्षक नाराज झाले आहेत. 'रामायण' हा ४००० कोटींचा चित्रपट आहे. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत आणि दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.

'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. सनी देओल प्रभू हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत.लारा दत्ता (कैकेयी), रकुल प्रीत सिंग (शूर्पणखा), काजल अग्रवाल (मंदोदरी), अरुण गोविल (राजा दशरथ), विवेक ओबेरॉय (विद्युज्जिह्व), कुणाल कपूर (इंद्र देव), आदिनाथ कोठारे (भरत) यांचा समावेश आहे, तर अनुपम खेर यांनी जटायूला आपला आवाज दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT