Ramayana Collection AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Ramayana Collection : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाने तिकिट खिडकीवर मारली बाजी, ७ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींची बंपर कमाई

Ramayana Box Office Collection Day 7 : 'रामायण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सातव्या दिवशीही चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. दिवाळीत चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.

Shreya Maskar

रणबीर कपूर पहिल्यांदाच प्रभू श्रीरामांची भूमिकेत

यश रावणाच्या भूमिकेत दिसला.

'रामायण'मध्ये भव्य दृश्यांचा नजराणा पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाची सध्या मोठी चर्चा आहे. भारतीय पौराणिक कथा जागतिक स्तरावर भव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे. तर यश रावणाची भूमिका साकारत आहे.५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise Of A Legend) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. दिवाळी उत्सवात चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या सुट्ट्यांमुळे कमाईच्या आकड्यांमध्ये आणखी भर पडली.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ७

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाने बुधवारी म्हणजेच रिलीजच्या ७ व्या दिवशी ७०.६५ कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाची देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई ५११.१० कोटी रुपये झाली आहे.दरम्यान, 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड'ने जागतिक बॉक्स ऑफिसवर ६७३.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'रामायण' चित्रपटाने ७ दिवसांत जगभरात ९०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

  • दिवस १ (गुरुवार) - ६४.८५ कोटी रुपये

  • दिवस २ (शुक्रवार) - ४८.०५ कोटी रुपये

  • दिवस ३ (शनिवार) - ६९.८० कोटी रुपये

  • दिवस ४ (रविवार) - ५६.१५ कोटी रुपये

  • दिवस ५ (सोमवार) - १०७.५० कोटी रुपये

  • दिवस ६ (मंगळवार) - ९४.१० कोटी रुपये

  • दिवस ७ (बुधवार) - ७०.६५ कोटी रुपये

  • भारतातील एकूण नेट कमाई - ५११.१० कोटी रुपये

रामायण चित्रपटाची कथा महर्षी वाल्मीकी यांच्या रामायणावर आधारित आहे. अयोध्येचा राजकुमार श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर चित्रपट आधारित आहे. कैकेयीच्या वचनामुळे श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागतो. त्यांच्यासोबत माता सीता आणि लक्ष्मणही वनवासाला जातात. पुढे रावणाकडून सीतेचे अपहरण होते आणि त्यानंतर श्रीराम व रावण यांच्यातील महायुद्धाची सुरुवात होते.'रामायण' चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laundry Tips : कपडे धुताना एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागला? घाबरू नका, महागड्या ड्रायक्लीनिंगची गरज नाही; वापरा 'ही' सोपी ट्रिक

Maharashtra News Live Update: पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेची CBI आणि ED मार्फत चौकशी होणार

Mumbai Crime: मुंबई हादरली! १० जणांकडून नवरा-बायको अन् मुलीवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् काठ्यांनी मारहाण

Rain Alert : धो धो पाऊस कोसळणार! १५ राज्यांना पावसाचा इशारा; ताशी ७० च्या वेगाने वारे वाहणार

Thursday Horoscope : आज या ४ राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळणार आनंदाची बातमी; वाचा आजचे भविष्य

SCROLL FOR NEXT