Hanuman Actors SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hanuman Actors : पडद्यावर हनुमान बनून घराघरांत पोहोचले 'हे' १० कलाकार, अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने; सनी देओलच्या आधी कोणी मारली बाजी?

Sunny Deol-Ramayana : सनी देओलच्या आधी अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे. आता सनी देओलच्या हनुमान अवताराबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shreya Maskar

सनी देओल 'रामायण' चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार

टीव्ही मालिकांमधूनही अनेक कलाकारांनी हनुमानाची भूमिका गाजवली

दारा सिंह यांची हनुमानाच्या भूमिकेतील लोकप्रियता आजही कायम

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण पार्ट १' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या भव्य सिनेमात अभिनेता सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारत आहे. सनी देओलच्या दमदार आवाजामुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे त्याच्या या भूमिकेकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. 'रामायण'च्या दुसऱ्या भागात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार आहे. पहिल्या भागात भगवान हनुमानाची झलक पाहायला मिळाली.

भगवान श्रीरामांचे परमभक्त हनुमान यांची व्यक्तिरेखा भारतीय मनोरंजनविश्वात अत्यंत लोकप्रिय आहे. हनुमान म्हणजे अतुलनीय शक्ती, निस्सीम भक्ती, धैर्य आणि सेवाभाव यांचे प्रतीक. रामायणावर आधारित चित्रपट आणि मालिकांमध्ये हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे.

पाल शर्मा

अभिनेते पाल शर्मा यांनी बाबुभाई मिस्त्री यांच्या 'संपूर्ण रामायण' चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली होती.

दारा सिंह

दारा सिंह यांनी १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगबली' चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली. त्यानंतर रामानंद सागर यांच्या लोकप्रिय 'रामायण' मालिकेत ते हनुमान बनले.

विंदू दारा सिंह

दारा सिंह यांचे पुत्र विंदू दारा सिंह यांनीही हनुमानाची भूमिका साकारली. १९९५-९६ च्या 'जय वीर हनुमान' या मालिकेत ते हनुमानाच्या भूमिकेत दिसले. याशिवाय २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट 'श्री रामदासू'मध्येही त्यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली.

राज प्रेमी

१९९७ मध्ये प्रसारित झालेल्या 'जय हनुमान' या दूरदर्शन मालिकेत अभिनेता राज प्रेमी यांनी हनुमानाची भूमिका साकारली.

दानिश अख्तर सैफी

अभिनेता आणि कुस्तीपटू दानिश अख्तर सैफी यांनी २०१५ मध्ये प्रसारित झालेल्या 'सिया के राम' मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली.

निर्भय वाधवा

अभिनेता निर्भय वाधवा यांनी २०१५ ते २०१७ या काळात प्रसारित झालेल्या 'संकटमोचन महाबली हनुमान' मालिकेत प्रौढ हनुमानाची भूमिका साकारली.

इशांत भानुशाली

बालकलाकार इशांत भानुशाली यांनी 'संकटमोचन महाबली हनुमान' या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका साकारली. त्यांच्या निरागस अभिनयातून बाल हनुमानाचे खोडकरपण, उत्सुकता आणि भक्तिभाव दाखवण्यात आला.

एकाग्र द्विवेदी

२०२० मध्ये प्रसारित झालेल्या 'कहत हनुमान जय श्री राम' मालिकेत बालकलाकार एकाग्र द्विवेदी यांनी हनुमानाची भूमिका साकारली.

विक्रम शर्मा

२००८ मध्ये आनंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत अभिनेता विक्रम शर्मा यांनी हनुमानाची भूमिका साकारली. या मालिकेत गुरमीत चौधरी यांनी श्रीराम आणि देबिना बॅनर्जी यांनी सीतेची भूमिका केली होती.

देवदत्त नागे

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे यांनी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली.

हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा प्रवास पाहिला तर भारतीय मनोरंजनविश्वातील बदल स्पष्टपणे दिसून येतात. दारा सिंह यांच्या पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण सादरीकरणापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या 'आदिपुरुष'पर्यंत हनुमानाची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या शैलीत सादर झाली आहे. आता प्रेक्षक सनी देओलला हनुमानाच्या भूमिकेत पाहायला उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC ची तयारी, KBC मध्ये सहभाग अन् शेवटी 'चोर'! बीटेक पदवीधराच्या अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासाची थरारक कहाणी

Pune : पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक; 825 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प

Diwali Parenting Tips: दिवाळीत घरी पाहुणे येणार आहेत? मग, मुलांना आधीच शिकवा या ५ गोष्टी; ऐनवेळी होणार नाही फजिती!

Maharashtra News Live Update: गुलाबी थंडीची चाहूल अन् भक्तिसंगीताची बरसात; पुण्यात रंगली दिवाळी पहाट

मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, थेट घरी घेतला जेवणाचा आस्वाद

SCROLL FOR NEXT