Ram Charan Upasana Baby Name 
मनोरंजन बातम्या

Ram Charan - Upasana Daughter Naming Ceremony : राम चरण - उपासनाच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न ; पारंपारिक पद्धतीत संपन्न झाला सोहळा

Pooja Dange

Ram Charan - Upasana Daughters Naming Ceremony : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणच्या घरी लेकीच आगमन झालं आहे. काही दिवसांपूर्वी उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राम चरण आणि उपासना आई-बाबा झाले आहे.आज त्यांच्या मुलीचा नामकरण सोहळा पार पाडला.

राम चरण आणि बायको उपासना दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ३० जून म्हणजेच आज सकाळपासून नामकरण सोहळ्याची तयारी सुरू होती. याचे फोटो उपासनाने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केले होते. तर आता नामकरण सोहळा पार पडला आहे. (Latest Entertainment News)

नीता - मुकेश अंबानींनी राम चरणच्या मुलीला दिला सोन्याचा पाळणा भेट

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि बायको उपासना आई-बाबा झाले आहेत. उपासनाने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. राम चरणवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी भेटवस्तू ही दिल्या आहेत. यातच आता नीता आणि मुकेश अंबानीनी राम चरणच्या मुलीला सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. या पाळण्याची किंमत १ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

राम चरण आणि बायको उपासनाने सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करुन नाव जाहीर केले आहे. राम चरणच्या मुलीचे नाव 'कलिन कारा कोनिडेला' असे आहे. राम चरणच्या गोंडस मुलीला हे नाव तिच्या आजी आजोबांनी दिलं आहे.

राम चरण आणि बायको उपासनाने सोशल मीडियावर मुलीचं नाव जाहीर केलं आहे. कुंटुंबासोबतचे फोटोही शेअर केले आहे. राम चरणच्या या फोटोत मेगा स्टार चिरंजीवी, त्यांची बायको आणि उपासना तिचे आई वडील दिसत आहे.

एका फोटोत राम चरण, उपासना आणि नातीचे आजी आजोबा दिसत आहेत. फोटोत कलिन कारा झोळीत झोपल्याचे दिसत आहे. या फोटोत सर्वांनीच पारंपरिक पेहराव केल्याचे दिसत आहे.

पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लुंगी कलिन काराच्या आजोबांनी परिधान केले आहे तर आजीनी पांढऱ्या-क्रिम रंगाची साडी नेसली आहे. राम चरणने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लेंगा घातल्याचे दिसत आहे. तर उपासनाने साडी नेसली आहे. या फोटोंवरुन नामकरण सोहळा अत्यंत पारंपारिक पद्धतीत साजरा झाल्याचे दिसत आहे. अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा झाला आहे.

राम चरणच्या मुलीचे नाव 'कलिन कारा कोनिडेला' असे आहे. या नावाचा अर्थ खूप वेगळा आणि खास आहे. चिमुकलीच्या नावाचा अर्थ आहे एक परिवर्तनकारी, शुद्ध करणारी, ऊर्जा निर्माण करणारी, आध्यात्मिक जागृती असलेले तेज असा आहे.

कलिन काराचे आजोबा मेगा चिरंजीवीनी यांनी सर्वात आधी आजोबा झाल्याची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली होती. आजही त्यांनी सोशल मीडियावरुन नातीचं नाव जाहीर केल आहे. "चेंचू आदिवासी देवी भौरम्मा देवीच्या आशीर्वादाने, आम्ही आमच्या लाडक्या नातीची ओळख करून देत आहोत.

'कलिन कारा कोनिडेला' हे नाव ललिता सहस्रनामममधून घेतलेले आहे. हे नाव एक परिवर्तनकारी, शुद्ध ऊर्जा दर्शवते ज्यामुळे आध्यात्मिक जागृत होते. - खूप प्रेम - सुरेखा, शोबाना, चिरंजीवी आणि अनिल."असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT