राखी सावंतचा ड्रामा, आता बनली 'स्पायडरवुमन' लुक पाहुन तुम्हीही हसाल Instagram/@rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

राखी सावंतचा ड्रामा, आता बनली 'स्पायडरवुमन' लुक पाहुन तुम्हीही हसाल

सध्या राखीचा हटके लुक असलेला एक व्हिडीओ आणि फोटोज् व्हायरल झाले आहेत. ज्यात राखीने चक्क स्पायडरमॅनचा ड्रेस परिधान केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रामेबाजीमुळेच जास्त चर्चेत असते, त्यामुळे तिला ड्रामाक्वीन म्हटलं जातं. सेलिब्रिटींवर टीका करणं असो की, इतर अभिनेत्रींशी पंगा असो. निवडणुक लढवणं असो की, स्वतःचं स्वयंवर असो राखी सगळीकडेच आपल्या आगळया - वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते. कधी ती रस्त्यावर शॉपिंग करताना दिसते तर कधी जीममध्ये व्यायाम करताना दिसते. (Rakhi Sawant's drama, now it has become 'Spiderwoman' look, you will laugh too)

हे देखील पहा -

सध्या राखीचा हटके लुक असलेला एक व्हिडीओ आणि फोटोज् व्हायरल झाले आहेत. ज्यात राखीने चक्क स्पायडरमॅनचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या हातात एक बॅग आहे तर, गळ्यात सोनोरी रंगाच्या जाड चैनी आहेत. तसेच तिने तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग लाल रंगाने रंगवला आहे. सोबतच एक म्युझिक बॉक्स घेऊन ती गाणे लावून नाचताना दिसतेय. कसलंतरी शुटींग चालू असताना राखीने फोटोग्राफर्सना बोलवलं आणि विविध पोज देऊन फोटो काढू लागली. खाली एक गादी अंथरलेली होती. त्यावर गदा होती. राखी या गादीवर झोपली आणि बिगबॉस मला परत शो मध्ये घ्या असं ओरडू लागली. तिचा हाच व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

राखी इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. फेब्रुवारी २०२१ मध्ये ती बिगबॉसच्या १४ व्या सीजनमध्ये दिसली होती. आईच्या सर्जरीसाठी तिने शो अर्ध्यातच सोडला होता. काही दिवसांपुर्वी तिचं 'मेरे ड्रीम मे तेरी एंट्री' हे गाणं रिलीज झालं होतं. ती सतत काही ना काही करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावपळ

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT