Rakhi Sawant Want Z Security Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Want Z Security: काय सांगता...! राखीला हवी आहे Z सुरक्षा; लवकरच पंतप्रधान मोदींची घेणार भेट

राखीला बिश्नोई गँगकडून धमकीचा मेल आल्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे Z सुरक्षेची मागणी केली आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant Want Z Security: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत राहणारे नाव. नेहमीच प्रकाशझोतात राहण्यासाठी काहीही करणाऱ्या राखीला केंद्र सरकारकडून Z सुरक्षा हवी आहे. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमानला बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी आली होती. आपल्या भाईजानला धमकी मिळाल्यानंतर राखी कमालीची संतापली होती. त्यानंतर तिला सुद्धा धमकीचा मेल आला होता.

गेल्या काही महिन्यांपासून राखी बरीच चर्चेत आहे. आधी आईचे निधन, नंतर आदील खान प्रकरण यामुळे ती कमालीची चर्चेत होती. सलमानला धमकीचा मेल आल्यानंतर राखीला ही धमकीचा मेल आला होता. तिला बिश्नोई गँगच्या प्रिन्स नावाच्या सदस्याने मेल केला होता. त्या मेलमध्ये, तिला सलमानच्या वादात बोलण्याची मनाई केली होती. तिला सुद्धा जिवे मारण्याची धमकी मिळाली होती.

या सर्व घटनेनंतर राखीने गजब मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. नुकतेच राखीने माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी तिने पंतप्रधान मोदींकडे तिला Z सुरक्षा हवी आहे अशी मागणी केली.

इन्स्टंट बॉलिवूड या एन्टरटेन्मेंट पोर्टल सोबत बोलताना राखी म्हणते, “ मी माननीय पंतप्रधान महोदयांना भेटणार आहे. मी मोदीजींकडे माझ्या सुरक्षेसंबंधित भेटणार आहे. मला Z सुरक्षा हवी आहे. मी मोदीजींना आणि राजनाथजींना माझ्या Z सुरक्षेसाठी भेटणार आहे.” (Bollywood News)

त्यानंतर ती कंगनाच्या सुरक्षेचा हवाला देत म्हणते, “जर कंगनाला सुरक्षा मिळू शकते, तर मला का नाही? तिला कोणतीही धमकी मिळाली नसताना सुद्धा केंद्र सरकारने तिला सुरक्षा पुरवली. मला तर धमकी मिळाली आहे, माझ्याकडे मेल सहित पुरावा आहे.” असा म्हणत तिने केंद्र सरकारकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे. (Bollywood Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

ZP Election Date : पुणे-सोलापूरसह १२ झेडपीचा आज धुरळा उडणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

Bigg Boss Marathi 6 : भांड्यांचा ढिगारा पाहून स्पर्धक चक्रावले; टास्कदरम्यान 'ही' सदस्य बेशुद्ध पडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा

IndBank Recruitment 2026: परीक्षा नाही थेट सरकारी बँकेत नोकरी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT