Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण जिंकणार! बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखीने केला 'तो' व्हिडीओ पोस्ट

Rakhi Sawant Video: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सांवतने व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉसच्या घरात नवव्या आठवड्यात राखी सांवतने हजेरी लावली होती. राखीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच निक्कीला चांगलच निशाण्यावर घेतलं होतं. सोशल मीडियावर राखीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला जो सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय.

राखी सांवतने तिच्या इन्स्टाग्राम हॅडलवर व्हिडीओ पोस्ट केली आहे. राखीने म्हटलंय, ' हॅलो कसे आहात? मी बिग बॉस मराठीमध्ये गेले होते, मला असं वाटतंय की, सूरज चव्हाण जिंकणार आहे. तोच ट्रॉफी घेणार आहे. तर मला संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगायचं आहे की, सूरजलाच वोट करा. तो ज्या पद्धतीने बोलतो, ते मला आवडतं.'

पुढे तिने,' तो पाण्यासारखा निर्मळ आहे. तो बिग बॉसमधून जिंकून यायला पाहिजे. त्यामुळे त्याला भरपूर वोट करा' असं म्हटलं आहे. राखीच्या या पोस्टवर सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना सूरजचं जिंकणार असल्याचं म्हटलं आहे.

बिग बॉस मराठी सीझन 5 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी, सूरज चव्हाणस अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत चव्हाण हे स्पर्धक आहेत. यापैकी कोणाच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी येईल हे पाहणं औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

SCROLL FOR NEXT