Rakhi Sawant , Mumbai Police, Traffic Jam, Viral Video
Rakhi Sawant , Mumbai Police, Traffic Jam, Viral Video saam tv
मनोरंजन बातम्या

राखी सावंतच्या 'त्या' कृतीवर नेटीझन्स भडकले, मुंबई पाेलिसांकडं कारवाईची मागणी; नेमकं काय घडलं (व्हिडिओ पाहा)

Siddharth Latkar

मुंबई : आपल्या वेगळ्या अंदाजात वावरणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा एक व्हिडिओ साेशल मिडियात (Social Media) व्हायरल (Viral Video) हाेत असून ज्यामध्ये राखी ट्रॅफिक जॅममध्ये फसलेल्या वाहनधारकांना जहा हम खडे हाेते है लाईन वहीं से शुरु हाेती है असं म्हणत तिच्या कारमध्ये बसून पुढच्या प्रवासाला जाते. दरम्यान राखीच्या या कृतीवरुन नेटीझन्सनं तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित व्हिडिओ मुंबई पाेलिसांना (Mumbai Police) ट्विट (Tweet) करीत राखीवर कारवाईची मागणी केली आहे. (Rakhi Sawant News)

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी एकाने लिहिले, “सडक तेरा बाप का है क्या.” दुसरा म्हणाला, "चल बनवा दिया तुमने भाई, प्रतीक्षा करो अब कला का." तिसऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालून तिच्यावर कारवाई करण्याची विनंती केली. हे खूप दुर्देवी आहे की ती सामान्य लोकांना वेठीस धरत आहे. वाहतुकीस अडथळा आणत आहे.

चौथा म्हणताे, "ये लडाई करवायेगी भाई किसी दिन." पाचव्याने तर केस कराे इस नौटंकी औरत पर." असे म्हटलं आहे. सहाव्याने लिहिले, "इतनी मार मरेंगे ना ट्रॅफिक वाले पुरा अमिताभ बच्चन उतरेंगे." दरम्यान नेटीझन्सच्या मागणीनंतर मुंबई पाेलिसांनी संबंधित ठिकाण काेणतं आहे याची माहिती नेटीझन्सला विचारली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; काय आहेत प्रमुख कारणे?

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT