Rakhi Sawant  Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Arrested : राखी सावंतला अटक? मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप

राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केल्याचा दावा स्वतः मॉडेल शार्लिन चोप्रानं केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rakhi Sawant Arrested News : आताची सर्वात मोठी बातमी आहे. अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर आहे, असेही समजते. राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केल्याचा दावा संबंधित मॉडेलने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे.

राखी सावंतला अटक केल्याचा दावा शार्लिन चोप्रा हिने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केला आहे. राखी सावंत अॅरेस्टेड, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे. याशिवाय तिनं एफआयआरमध्ये कोणकोणत्या कलमान्वये गुन्ह्यांची नोंद केली आहे, हे देखील सांगितले आहे.

शार्लिन चोप्रा हिनं काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अंबोली पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची माहिती शार्लिननं स्वतः दिली आहे.

Sherlyn Chopra tweet

दरम्यान, राखी सावंतचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्याचा दावाही शार्लिननं केला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये शार्लिन चोप्रा हिने पत्रकार परिषद घेतली होती. राखी सावंतने अश्लील व्हिडिओ सर्वांसमोर दाखवल्याचा आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप शार्लिनने केला होता. तसेच पोलिसांत राखीविरुद्ध तक्रारही नोंदवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT