Rakhi Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

राखी सावंतने घेतला नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

राखी सावंतने जेव्हा तिच्या लग्नाची बातमी सांगितली तेव्हा तिचे रितेशसोबतचे नाते खूपच गूढ होते. पण बिग बॉस 15 मध्ये पहिल्यांदाच राखीचा पती रितेश लोकांसमोर आला.

Shivani Tichkule

मुंबई - मनोरंजन विश्वात ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतसोबत रोज काही ना काही घडत असते, ज्यामुळे ती चर्चेत येते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे आणि ती लोकांची आवडती बनली आहे. पण वैयक्तिक जीवनातील तिचा संघर्ष नेहमीच वेगळ्या पातळीवर राहिला आहे. राखी सावंतने (Rakhi Sawant) जेव्हा तिच्या लग्नाची बातमी सांगितली तेव्हा तिचे रितेशसोबतचे नाते खूपच गूढ होते. पण बिग बॉस 15 (Big Boss) मध्ये पहिल्यांदाच राखीचा पती रितेश लोकांसमोर आला. पण आता हे नातेही मोडले आहे. राखी सावंतने सोशल मेडियावर एक पोस्ट टाकत याबाबद माहिती दिली आहे.

हे देखील पहा -

राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने पती रितेशसोबतच्या ब्रेकअपची बातमी शेअर केली आहे. राखी सावंतने लिहिले- प्रिय मित्र आणि शुभचिंतकांनो, रितेश आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस शो नंतर बरेच काही घडले आणि मी अशा अनेक गोष्टींचा सामना केला ज्यावर माझे नियंत्रण नव्हते.

आम्ही गोष्टी दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही झाले नाही. आम्ही कायमचे वेगळे व्हावे आणि वेगळे आयुष्य जगावे हेच आम्हा दोघांसाठी चांगले होते. मला हे सगळं व्हॅलेंटाईन डेच्या आगोदर तुम्हांला सांगायचं आहे, हे विचार करून मला खूप विचित्र वाटतं. माझे हृदय तुटले आहे. पण निर्णय घेणे आवश्यक होते. रितेशला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शिवाय, मला आता माझ्या पुढील करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात वेळ द्यायचा आहे. मला आनंदी जीवन जगायचे आहे. मला समजून घेतल्याबद्दल आणि समर्थन केल्याबद्दल धन्यवाद. अशी पोस्ट राखीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

राखी सावंत आणि रितेश हे बिग बॉस 15 मधील स्टार कपल होते. दोघांची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढली. दोघांची स्टाईल चाहत्यांनाही आवडली होती, पण घरात दोघांचे नाते अनेक गैरसमजांचे बळी ठरले आणि यादरम्यान अनेक चढउतारही पाहायला मिळाले. दोघांचे नाते फार कमी काळ टिकले आणि आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT