Rakhi Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

राखी बॉयफ्रेंडसोबत पोहोचली पोलीस स्टेशनला, रितेशवर लावले गंभीर आरोप

राखी सावंत सध्या दुबईस्थित बिझनेसमन आदिल दुर्रानीला डेट करत आहे. पण यावेळी ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

Shivani Tichkule

मुंबई - लाईमलाइटमध्ये कसे राहायचे हे राखी सावंतपेक्षा (Rakhi Sawant) चांगले कोणाला माहित आहे. कधी राखी सावंत तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखी सावंत सध्या दुबईस्थित बिझनेसमन आदिल दुर्रानीला डेट करत आहे. पण यावेळी ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. खरं तर, राखी सावंतचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहे, ज्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अलीकडेच तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबत मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिस स्टेशनच्या बाहेर राखीने पापाराझीशी बोलताना तिने रितेशवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी राखी ढसाढसा रडली.

राखी सावंतने रितेशवर तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला आहे. राखीचे म्हणणे आहे की रितेशने तिला उद्ध्वस्त करण्यासाठी तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले आहे. मीडियासमोर ढसाढसा रडत राखी सावंतने रितेशवर आरोप करत म्हटले, 'तो माझे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. तो म्हणतो की मी तुला आणि आदिलला उद्ध्वस्त करीन. मी तुला आणि आदिलला एकत्र राहू देणार नाही.

राखी सावंत पुढे म्हणाली, 'तीन वर्षांत त्याने माझ्यासोबत खूप गैरवर्तन केले. तो मला शिवीगाळही करायचा. आता त्याने माझे सोशल मीडिया हॅक केले आहे. माझे सर्व फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून तो मला का त्रास देत आहे. मी अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र तो मला आता ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे मी त्याची तक्रार करायला पोलिसात आले आहे. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला साथ देणार असे देखील ती यावेळी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT