Comedian Raju Srivastav Passed Away
Comedian Raju Srivastav Passed Away SAAM TV
मनोरंजन बातम्या

Comedian Raju Srivastav: 'तुम्ही सगळ्यांना हसवलं पण आम्हाला रडवलं' राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीनं शेअर केली भावनिक पोस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विनोदवीर राजू श्रीवास्तवचे 21 सप्टेंबर रोजी हृदयविकारामुळं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण देश हळहळला. त्यांचे निधन होऊन एक महिन्याचा कालावधी झाला. या निमित्ताने त्यांची पत्नी शिखा यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांचे स्मरण केले आहे.शिखाने पोस्ट शेअर करत "यादों में वो सपनों में है" या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

राजू यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं सोशल मीडियाचे अकाउंट हॅंडलिंग त्यांची कुटुंबीय करत आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवर तिनं एक पोस्ट केली आहे. शिखाने स्वामी चित्रपटातील गाणे गातानाचा राजू यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की,"तुमचं निधन होऊन एक महिना झाला, तुम्ही अजूनही आमच्यासोबत आहात आणि यापुढेही राहाल, असं आम्हाला नेहमी वाटतं. तसंच तिनं गाण्याचे बोल लिहिले आणि पुढे कॅप्शनमध्ये म्हटलं की,"तुम्ही हे गाणे इतक्या लवकर (फक्त 12 दिवसांत)प्रत्यक्षात आणाल हे माहीत नव्हते. हृदयाचे ठोके आपला विश्वासघात करतील हे माहीत नव्हते. तुम्ही सगळ्यांना हसवले पण आम्हाला रडवले.

राजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

स्टँड-अप कॉमेडीसाठी ओळखले जाणारे विनोदवीर राजू श्रीवास्तव बड्या कलाकारांची मेमिक्री करण्यात माहिर होते. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांची नक्कल करुन प्रेक्षकांना पोट धरून हसवायला त्यांना आवडायचं. परंतु,त्यांचे निधन झाल्यावर संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली. (Comedian)

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ब्लॉगवर लिहिलं, “आणखी एक सहकारी मित्र आणि सर्जनशील कलाकार आम्हाला सोडून गेला.अचानक आजारी पडला आणि वेळेआधीच गेला. त्यांची सर्जनशीलता वेळ पूर्ण होण्याआधी..दररोज सकाळी त्याच्या जवळच्या लोकांकडून माहिती मिळत असे.त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी मला व्हॉइस नोट पाठवण्याचा सल्ला दिला. मी केले.. त्यांनी त्याच्या कानात त्याच्यासाठी पाठवलेली व्हॉइस नोट वाजवले. एका क्षणासाठी त्याने डोळे उघडले आणि मग निघून गेली. (Amitabh Bachchan)

दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. जॉनी लीव्हर, कपिल शर्मा, किकू शारदा, सुगंधा मिश्रा, भारती सिंग, तिचे पती हर्ष लिंबाचिया, नितीन मुकेश, नील नितीन मुकेश आणि शाम कौशल यांच्यासह राजूचे सहकारी आणि इंडस्ट्रीतील मित्र प्रार्थना सभेला उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT