Comedian star Raju Srivastava Saam TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; अजूनही शुद्धीवर नाही

दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - प्रसिध्द स्टॅडअप कॅामेडीस्टार अशी ख्याती असणारे राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. आता राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. 10 ऑगस्ट रोजी कॉमेडियनला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्डियाक अरेस्टमुळे राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूवर वाईट परिणाम झाला आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम पूर्ण प्रयत्न करत आहेत.

साधरण एन्जॉप्लास्टी नंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते परंतु 43 तास उलटूनही राजू यांच्या प्रकृतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम, न्यूरोलॉजी अशा डॉक्टरांच्या विविध तुकड्या राजू यांच्यावर उपचार करत आहेत.

हे देखील पाहा -

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने वडिलांच्या तब्येतीची माहिती देताना सांगितले की, त्यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. आम्ही फक्त आशा करतो की ते लवकरात लवकर बरे होईल. माझी आई सध्या त्याच्यासोबत आयसीयूमध्ये आहे.

राजू श्रीवास्तव नेहमीप्रमाणे जिम मध्ये वर्कआउट करत होते. यावेळी वर्कआऊट करत असताना त्याची प्रकृती बिघडली. दरम्यान वर्कआऊट करताना ते ट्रेडमिलवरून खाली पडले आणि बेशुध्द झाले तेव्हा त्यांना ताबडतोब दिल्लीतील एम्स रूग्णालयात हलवण्यात आले.

त्यानंतर त्यांची एन्जॉग्राफी आणि एन्जॉप्लास्टी करण्यात आली. परंतु राजू सध्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. काल त्यांच्या मुलीनेही सर्वांना अपील केले होते. ती म्हणाली होती की, 'त्यांना आता औषधांची नाही तर प्रार्थनेची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT