Rajpal Yadav Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Rajpal Yadav Viral Video: मुश्ताक खान यांच्या शोकसभेतील राजपाल यादव यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांना बाहेर जा सांगितलं असल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हिडिओ मागील नेमकं सत्य जाणून घेऊयात.

Shruti Vilas Kadam

Rajpal Yadav Viral Video: दिवंगत अभिनेते मुश्ताक खान यांच्या शोकसभेला बुधवारी बॉलिवूड आणि मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. राजपाल यादव, राहुल रॉय, विंदू दारा सिंह, पूनम ढिल्लों, गजेंद्र चौहान, अर्जुन फिरोज खान, उपासना सिंह, सुनील पाल आणि दिलीप सेन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी शोकसभेला पोहोचले होते. यावेळीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मुश्ताक खान यांचं २४ सप्टेंबर रोजी निधन झालं. ते काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली. त्यांच्या शोकसभेत अनेक कलाकारांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राजपाल यादव यांचा व्हिडिओ चर्चेत

या सर्व व्हिडिओंपैकी अभिनेता राजपाल यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राजपाल यादव एका ठिकाणी उभे असून त्यांच्याशी एक महिला बोलताना दिसत आहे. ती महिला त्यांना बाहेर जाण्यास सांगताना दिसते. त्यामुळे राजपाल यादव यांना शोकसभेतून बाहेर काढण्यात आलं का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये राजपाल यादव यांचा अपमान झाल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, या व्हिडिओच सत्य पूर्णपणे वेगळं असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती राजपाल यादव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यावेळी त्यांच्या टीममधील व्यक्ती त्या व्यक्तीला पुढे जाण्यास सांगते. त्यानंतर संबंधित व्यक्ती फोन बाजूला करतो आणि माफी मागतो. तिथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनीही शोकसभा असल्याने फोटो काढण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगितलं. त्यामुळे राजपाल यादव यांना शोकसभेतून हाकलून दिल्याची रंगलेली चर्चा खोटी आहे.

मुश्ताक खान यांच्या निधनापूर्वी राजपाल यादव भेटले होते

मुश्ताक खान यांच्या निधनानंतर राजपाल यादव यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. निधनाच्या काही तास आधीच आपण मुश्ताक खान यांना भेटलो होतो, त्यांच्या हात हातात घेऊन त्यांच्याशी बोलले असल्याची आठवण त्यांनी सांगितली होती.

राजपाल यादव यांचं आगामी काम

राजपाल यादव सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत आहेत. तो सलमान खानच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. मात्र, चित्रपटाचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

SCROLL FOR NEXT