Shruti Vilas Kadam
ऐश्वर्या राय बच्चनने पॅरिस फॅशन वीकमध्ये लॉरिअल पॅरिस च्या ‘द फॅशन शो’ शोमध्ये रॅम्प वॉक करत ग्लॅमरस अंदाजात एन्ट्री केली.
ऐश्वर्याने यारा शूमेकर यांच्या Fall/Winter 2026-27 कॉउचर कलेक्शन मधील ब्लॅक वेल्वेट कस्टम गाऊन परिधान केला होता.
तिच्या गाऊनवर 3D फ्रिंज एम्ब्रॉयडरी आणि क्रिस्टल डिटेलिंग करण्यात आली होती. लांब केपमुळे तिच्या लूकला रॉयल टच मिळाला.
या लूकमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचा फायरी रेड हेअर कलर. साइड पार्टिंग आणि सॉफ्ट वेव्ह्समध्ये स्टाइल केलेल्या केसांनी तिच्या लूकला बोल्ड टच दिला.
ऐश्वर्याने आउटफिटसोबत डायमंड क्राउन आणि डायमंड रिंग्स परिधान केल्या. त्यामुळे तिचा संपूर्ण अंदाज आणखी रॉयल दिसत होता.
मेकअपसाठी तिने बोल्ड रेड लिप्स, विंग्ड आयलाइनर, फेदर्ड आयब्रोज आणि सॉफ्ट कंटूरिंगचा पर्याय निवडला. लाल केस आणि रेड लिप्समुळे लूकला सुंदर कॉन्ट्रास्ट मिळाला.
पॅरिस फॅशन वीकदरम्यान ऐश्वर्या ब्रिटिश-इंडियन अभिनेत्री सिमोन एश्लेसोबतही दिसली. दोघींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला.