Rajpal Yadav saam tv
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav : "माझ्याकडे १२०० कोटी..."; तुरूंगातून सुटलेल्या राजपाल यादवचा मोठा दावा

Rajpal Yadav Big Statement : 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे तुरूंगात असलेल्या राजपाल यादवची सुटका झाली आहे. राजपाल यादवने तुरूंगातून बाहेर आल्यावर मोठे विधान केले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे तुरुंगात होता.

राजपाल यादवची आता तुरूंगातून सुटका झाली आहे.

राजपाल यादवने तुरूंगातून बाहेर आल्यावर मोठे विधान केले आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चांगलाच चर्चेत आहे. तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी अभिनेता राजपाल यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या चेक बाउन्स प्रकरणाबद्दल उघडपणे सांगितले. येत्या काळात त्यांच्याकडे अनेक प्रकल्प आहेत, ज्यामुळे तो श्रीमंत होईल, असेही त्यांनी सांगितले. तिहार तुरुंगात असताना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आलेल्या स्टार्स आणि चाहत्यांचे त्यांनी आभार मानले.

1200 कोटींचे काम

राजपाल यादव यांनी सांगितले की, प्रॉडक्शन हाऊस उघडण्यामागील एकमेव उद्देश लहान शहरांमधील आणि संघर्ष करणाऱ्या उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे हा होता. पुढील 7 वर्षांसाठी माझ्याकडे 1200 कोटी रुपयांचे ब्रँडिंग काम आहे. माझे 4 करार आहेत आणि त्यात चित्रपटांचा समावेश नाही. काही प्रकल्प 200 कोटी रुपयांचे आहेत आणि काही 2000 कोटी रुपयांचे आहेत. यातील काही माझे मानधन आहे आणि काही इतर प्रकल्पांमध्ये माझे शेअर्स आहेत. माझे 10 चित्रपट येणार आहेत. 'भूत बांगला' प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 'वेलकम टू द जंगल' येत आहे. त्यानंतर आणखी काही प्रकल्प आहेत."

"मी राजा होतो, मी राजा आहे"- राजपाल यादव

राजपाल यादवने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच त्यांना सन्मानाने पैसे परत करेन, असे म्हणाला. राजपाल यादव म्हणाला, "मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मला राजासारखे जगायचे आहे आणि मजुरांसारखे काम करायचे आहे. मी राजा होतो, मी राजा आहे आणि मी नेहमीच राजा राहीन. राजा हा राजा असतो, मग तो तुरुंगात असो किंवा इथे, आणि राजा कधीही पळून जात नाही."

अभिनेता राजपाल यादवला 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी तो जेलमधून बाहेर आला आहे. राजपाल यादवने नुकतेच स्वतःचे युट्यूब चॅनेल देखील उघडले आहे. चाहते देखील आता त्याच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहे. त्यांनी आजवर अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानामुळे पशुपालक सापडले संकटात

IPL सुरू असतानाच टीम इंडियासाठी आली बॅड न्यूज; इंग्लंड, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांना २ खेळाडू मुकणार

Side Effects Of Eating Non-Veg In Summer: उन्हाळ्यात नॉन व्हेज खावे की नाही? किती प्रमाणात खावे? जाणून घ्या

Solapur Crime: तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले, मध्यरात्री आई अन् दोन मुलांची तलवारीने वार करत हत्या

SCROLL FOR NEXT