Rajinikanth Touching Yogis' Feet 
मनोरंजन बातम्या

Rajinikanth Touching Yogis' Feet: सुपस्टार रजनीकांत योगींच्या पाया का पडले? अभिनेत्याने सांगितले कारण

Pooja Dange

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाय पडल्यामुळे सुपरस्टार रजनीकांतला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले. अभिनेता रजनीकांत यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची लखनऊ येथील निवासस्थानी भेट घेतली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी यावेळी सांगितले की 'योगी किंवा संन्याशांच्या पायांना स्पर्श करून पाय पडण्याची सवय आहे' असे म्हटले आहे.

रजनीकांत यांची प्रतिक्रिया

जेलर चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच रजनीकांत हिमलायात गेले होते. त्यानंतर अनेक भेटीगाठी घेत अखेर त्यांचा हा प्रवास सोमवारी रात्री संपला. रजनीकांत काल चेन्नईला पोहोचले. विमानतळाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाय पडण्याविषयी विचारले असता यावर प्रतिक्रिया रजनीकांत म्हणाले, 'त्यांनी हे त्यांच्या प्रती असलेल्या आदर म्हणून केले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालात रजनीकांत म्हणाले, "योगी किंवा संन्याशांच्या पायांना स्पर्श करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे ही माझी सवय आहे, जरी ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी मी ते केले आहे."

रजनीकांत जेलरबद्दल

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटाला "भव्य यश" मिळाल्याबद्दल लोकांचे आभार मानले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मला राजकारणावर बोलायचे नाही. उत्तर प्रदेशच्या भेटीदरम्यान, रजनीकांत यांनी त्यांच्या जेलर चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते ज्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते. त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

रजनीकांत - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट

गेल्या आठवड्यात, रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेट घेतली. त्यांच्या पाया देखील पडले तसेच त्यांना फुलांचा गुच्छही दिला. दोघांनी फोटोग्राफर्सना पोज दिली. या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

X वरील व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना (पूर्वीचे ट्विटर) एका व्यक्तीने लिहिले आहे, "महिन्यातील सर्वात मोठा फेसपाम आणि क्रिंगफेस्ट व्हिडिओ." आणखी एका ट्विटमध्ये लिहिले होते, "72 वर्षीय रजनीकांत 51 वर्षीय योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श करताना..." एका व्यक्तीने असेही लिहिले, "हे धक्कादायक आहे!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT