Jackie Shroff on Rajinikanth Saam TV
मनोरंजन बातम्या

Jackie Shroff On Rajinikanth : रजनीकांत मला सॉरी म्हणाले, जॅकी श्रॉफने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

Jackie Shroff - Rajinikanth : जॅकी श्रॉफने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला.

Pooja Dange

Rajinikanth Apologies Jackie Shroff : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे इंडस्ट्रीतील जॉली व्यक्तिमत्त्व आहे. ६६ वर्षीय जॅकी दादा अजूनही चित्रटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. जॅकी श्रॉफला जबरदस्त अ‍ॅक्शन करताना आपण चित्रपटामध्ये पाहिले आहे. तसेच नकारात्मक भूमिकांमधून त्याने चाहत्यांना इम्प्रेस केले आहे.

आता पुन्हा एकदा तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध साऊथचा मेगास्टार रजनीकांत असणार आहे. अलीकडेच, जॅकी श्रॉफने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला. यात शूटिंग सेटवर मेगास्टारने त्याला सॉरी का म्हटले हे सांगितले.

जॅकी श्रॉफने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सविस्तर सांगितले. जॅकी म्हणाला की, शूटिंग दरम्यान काय घडले होते की रजनीकांत त्याच्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण करून परत आले आणि त्यांनी जॅकीला सॉरी म्हटले.

जॅकी म्हणाला, मला आठवते की रजनीकांतनी त्यांचे शूटिंग पूर्ण केले आणि त्यानंतर ते आपल्या घरी निघून गेले. माझे काही सीन शूट व्हायचे बाकी होते. रजनीकांत त्यांच्या गाडीतून निघाला होते पण ते थांबले आणि माझ्याकडे परत आला. ते फक्त माझा निरोप घेण्यासाठी परत आले होते.

जॅकीने पुढे सांगितले की, रजनीकांत परत आलेआणि त्यांनी मला सॉरी म्हटले. ते म्हणाला की ते माझा निरोप घेण्यासाठी आले आहेत. ते घाई-घाईत विसरले. यानंतर रजनीकांतने असेही विचारले की मला त्यांची गरज आहे का, तसं असेल तर आणखी काही काळ सेटवर मी थांबतो.

सेटवर रजनीकांतचे हे वागणे पाहून जॅकी श्रॉफ खुप इम्पेस झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला. ते चित्रपटाचा मुख्य अभिनेते आहेत आणि मी गेस्टची भूमिका केली होती. मला शूटिंग करताना खूप आनंद झाला. रजनीकांत यांनी आम्हाला खूप प्रेम आणि आदर दिला. एका कुटुंबाप्रमाणे त्यांनी आमची काळजी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT