Rajeshwari Kharat x
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat : मी लहानपणापासूनच ख्रिश्चन, कोणता धर्म बदलला नाही; धर्मांतराच्या चर्चांवर 'फँड्री' फेम शालूची रोखठोक प्रतिक्रिया

Rajeshwari Kharat News : अभिनेत्री राजेश्वरी खरात धर्मांतराच्या चर्चांमुळे ट्रोल होत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर राजेश्वरीची ट्रोलिंग सुरु झाली. या एकूण प्रकरणावर राजेश्वरीने प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

फँड्री चित्रपटामुळे अभिनेत्री राजेश्वरी खरातला प्रसिद्धी मिळाली. फँड्री चित्रपटातील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या राजेश्वरीने अलीकडेच काही फोटो शेअर केले होते. धर्मांतराच्या मुद्यावरुन राजेश्वरीला ट्रोल करण्यात आले होते. या प्रकरणावर राजेश्वरीने स्पष्टीकरण दिले आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलवर भाष्य केले. ख्रिश्चन कुटुंबातच माझा जन्म झाला आहे. मी कोणताही धर्म बदललेला नाही. लोकांचा दृष्टिकोन मर्यादित आहे, ते फक्त फोटो पाहून निर्णय घेतात. सत्य काय आहे हे पाहण्याची तयारी त्यांच्याच नसते, असे राजेश्वरी खरात म्हणाली.

राजेश्वरी खरात म्हणाली, 'लोक विचार न करता केवळ फोटोवरुन कमेंट्स करतात. ट्रोल करतात. ट्रोलिंग करणारे अनेकदा अजब मॅसेज पाठवतात. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुला भेटायचे आहे असे असंख्य मेसेज मला येत असतात. धर्मांतर ही वैयक्तिक निवड असून, त्यावरून लोकांनी कोणावरही टीका करणे चुकीचे आहे.'

'प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. टीका करणारे अनेकदा स्वतःच्या अपयशामुळे, रागामुळे अशा प्रकारे व्यक्त होतात. सोशल मीडियावर त्यांना व्यासपीठ मिळाते आणि मग ते वाईट कमेंट्स करतात. लोकांनी आधी सत्य समजून घेतले पाहिजे. कोणावरही माहितीशिवाय टीका का करायची? त्याला टार्गेट का करायचे? प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण किती आणि कधी बोलावं हे लोकांना समजायला हवे', असे वक्तव्य राजेश्वरीने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या

Ankita Walawalkar Photos: 'रूपाची खान, दिसते छान' अंकिता वालावलकरचं सौंदर्य

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

SCROLL FOR NEXT