Riteish Deshmukh - Raja Shivaji saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Riteish Deshmukh- Raja Shivaji Movie Teaser : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. जो पाहून चाहते भारावून गेले आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटात दिग्गज कलाकारांची स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगितली जाणार आहे.

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २'चा बोलबाला असताना आता रितेश भाऊंनी मोठा धमाका केला आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर आला आहे. आता सोशल मीडियावर फक्त रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हातात तलवार घेऊन स्वातंत्र्यासाठी लढताना रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगितली जाणार आहे. 'राजा शिवाजी' चा टीझर पहिल्यांदा 'धुरंधर २'च्या स्क्रीनिंगदरम्यान थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

टिझरचे हटके कॅप्शन

"हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!!

दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं. छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.

हर हर महादेव."

टीझरच्या कमेंट्स

'राजा शिवाजी'च्या टीझरवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. रितेश देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून चाहते भारावून गेले आहेत. नेटकरी कमेंट्स करता की, "जय शिवराय", "पाहताच अंगावर आला काटा", "मराठ्यांचा इतिहास संगीतने आणि दमदार अभिनयाने पुन्हा मना-मनात जिवंत जागा होईल. हर हर महादेव..."," जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभाषेतच चित्रपट पहावा, कारण खरा इतिहास मराठीतूनच घडला आहे !", "जबरदस्त भाऊ...मराठी मधील भारी वाटतोय, सरळ हृदयात..."

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलियासोबतच आणखी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार झळकले आहेत. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, त्याची पत्नी जेनेलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.

'राजा शिवाजी' रिलीज डेट

'राजा शिवाजी' चित्रपटातील गाण्यांना अजय-अतुलने संगीत दिले आहे. 'राजा शिवाजी' हा भव्य चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

Baramati bypoll : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार, कुणी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

SCROLL FOR NEXT