Riteish - Raja Shivaji Collection day 28 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish-Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक घोडदौड सुरुच; २८ व्या दिवशी केली दमदार कमाई

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. २८ व्या दिवशीही चित्रपटाने उत्तम कमाई करत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Shruti Vilas Kadam

Riteish-Raja Shivaji Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या महिन्यातही बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल २८ दिवस उलटूनही त्याच्या कमाईचा वेग मंदावलेला दिसत नाही. उलट प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ‘राजा शिवाजी’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढवतच आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या २८ व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ‘राजा शिवाजी’ने ४० लाखांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण होऊनही चांगली कमाई होत आहे. विशेष म्हणजे, चौथ्या बुधवारच्या तुलनेत गुरुवारी चित्रपटाच्या कमाईत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.

‘राजा शिवाजी’ने आता देशभरात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नेट कमाई केली आहे. या कामाईमुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी हा मान ‘सैराट’ या चित्रपटाकडे होता. आता ‘सैराट’नंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून ‘राजा शिवाजी’ची नोंद झाली आहे.

या चित्रपटाच्या यशामागे त्याची भव्य निर्मिती, दमदार कथा आणि तगडी स्टारकास्ट हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. रितेश देशमुखसोबत संजय दत्त, जेनेलिया डिसूझा, भाग्यश्री, फरदीन खान, अभिषेक बच्चन आणि सलमान खान यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले आहेत.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT