Swara Bhaskar And Fahad Ahmad Wedding Reception  Instagram
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar And Fahad Ahmad: स्वरा- फहादच्या रिसेप्शन पार्टीत दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती, ‘या’ चेहेऱ्याने वेधले सर्वांचे लक्ष

स्वरा- फहादच्या लग्नाला अनेक देशातील राजकारण्यांनी हजेरी लावली होती. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Swara Bhaskar And Fahad Ahmad Wedding Reception: अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचे पती समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद सध्या त्यांच्या लग्नामुळे बरेच चर्चेत आहे. १६ फेब्रुवारीला स्वराने व्हिडीओ शेअर करत लग्नाची माहिती देत, सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. त्याच दिवशी दोघांनी एंगेजमेंट केली होती.

स्वरा- फहादचे काल रिसेप्शन दिल्लीत पार पडले. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह दिग्गज राजकारण्यांनीही लग्नाला उपस्थिती लावली होती. यावेळी स्वरा- फहादच्या लग्नाला राहुल गांधींसह अनेक देशातील राजकारण्यांनी हजेरी लावली होती. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

नुकताच त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दिसत आहेत. राहुल गांधी स्वरा- फहादच्या लग्नाला कडेकोट सुरक्षेत रिसेप्शनला पोहोचले. राहुल यांनी यावेळी त्या दोघांसोबत बराच वेळ संवाद देखील साधला.

दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही उपस्थिती लावली होती.

स्वरा- फहादच्या रिसेप्शन पार्टीला राहुल गांधी यांनी उपस्थिती दर्शवल्याने त्या दोघांनाही सध्या सोशल मीडियावर बरेच ट्रोल करण्यात येत आहे. जितके कौतुकाचे वर्षाव केले जात आहे, तितकेच त्यांना ट्रोल केले जात आहे.

स्वरा- फहाद यांनी १६ फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केल्यानंतर नुकतंच पारंपारिक पद्धतीने विवाह केला. १२ मार्च पासूनच यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली होती. सोबतच सोशल मीडियावर स्वरा- फहाद यांच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फहाद अहमद राजकीय नेते असल्याने त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक राजकारण्यांनी उपस्थिती लावली होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT