Rahul Deshpande Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Deshpande Divorce: प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट; लग्नाच्या १७ वर्षानंतर संसाराचा सूर बिघडला

Rahul Deshpande Divorce: गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्नी नेहा देशपांडे सोबतचा १७ वर्षांचा सहजीवन प्रवास संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Rahul Deshpande Divorce: हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा युवा चेहरा म्हणून ओळखला जाणारा आणि दिग्गज गायक पं. भीमसेन जोशी यांचा वारसा पुढे नेणारा गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्नी नेहा देशपांडे सोबतचा १७ वर्षांचा सहजीवन प्रवास संपवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतची अधिकृत माहिती त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून दिली आहे.

राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही दोघांनी मिळून शांतपणे आणि परिपक्वतेने हा निर्णय घेतला आहे. यात कोणताही वाद किंवा कटुता नाही. आता आम्ही आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा आयुष्याचा एक नवा अध्याय आहे, जो आम्ही धैर्याने आणि आशेने स्वीकारत आहोत.” तसेच त्यांनी चाहत्यांना आणि श्रोत्यांना आवाहन केले आहे की, “या निर्णयाचा सन्मान करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर राखा.”

राहुल देशपांडे यांनी पुढे लिहीले, 17 वर्षांच्या संसारानंतर आणि कितीतरी अविस्मरणीय आठवणींनंतर मी आणि नेहाने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये सौहार्दपूर्णरित्या पूर्ण झाले. मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला. जेणेकरून या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल.विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे.

राहुल आणि नेहा यांचा विवाह १७ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी मिळून आतापर्यंत आयुष्यातील अनेक सुख-दुःखाचे क्षण अनुभवले. राहुल देशपांडे हे फक्त शास्त्रीय संगीताचे गायकच नव्हे तर रंगभूमीवरील प्रयोगशील नाट्यगायक म्हणूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. विशेषतः ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील त्यांच्या प्रभावी गाण्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: EPFOचे ८ नियम बदलले; कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम

KDMC निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं; २७ गावांचा प्रश्न पेटला, स्वतंत्र नगरपालिकेची मागणी

दादरमधील स्टार मॉलला भीषण आग; अग्निशमन दलाचं बचावकार्य सुरू|VIDEO

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, सोलापुरातील राजकारणात उलाथपालथ

SCROLL FOR NEXT