Raha Kapoor And Soni Razdan Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Raha Kapoor : आजीसोबत लाँग ड्राइव्हला निघाली रणबीर- आलियाची लेक राहा ; पापाराझी येताच केलं असं काही की..., पाहा VIDEO

Raha Kapoor And Soni Razdan Video : पुन्हा एकदा राहा तिच्या क्यूट लूकमुळे चर्चेत आली आहे. राहाचा सध्या सोशल मीडियावर क्यूट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडच्या क्यूट कपलमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा समावेश होतो. हे कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतं. आलियाने २०२२ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी तिचं नाव राहा असं ठेवलंय. कायमच राहाच्या क्यूटनेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते. अशातच पुन्हा एकदा राहा तिच्या क्यूट लूकमुळे चर्चेत आली आहे. राहाचा सध्या सोशल मीडियावर क्यूट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

राहा अनेकदा कॅमेऱ्यासमोर स्वतःच क्यूट एक्स्प्रेशन देताना दिसते. राहा अनेकदा तिच्या आईसोबत, कधी तिच्या वडिलांसोबत, कधी आजी नीता कपूर यांच्यासोबत, कधी काका आयान मुखर्जीसोबत बाहेर फेर फटका मारताना स्पॉट होते. अशातच राहा तिची आजी सोनी राजदानसोबत फिरताना स्पॉट झाली आहे. आजी आणि नातीचा कारमध्ये फिरतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

विरल भयानी या पापराझी इन्स्टाग्राम पेजवर राहाचा आणि तिची आजी सोनी राजदान यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत राहा तिच्या आजीसोबत कारमध्ये फिरताना दिसत आहे. आजीच्या मांडीवर बसून राहा खिडकीच्या बाहेर डोकावताना दिसत आहे. याचदरम्यान पापाराझींनी तिचा क्यूट अंदाज कॅमेऱ्यात टिपला आहे. यावेळी सोनी नातीची खास काळजी घेताना स्पॉट झाल्या आहेत. नातीची काळजी घेत असल्यामुळे चाहते त्यांचे कौतुक करीत आहेत.

सोनी यांचं लक्ष पापाराझींकडे जाताच त्यांनी लगेचच राहाला मागे घेत कारची काच बंद केली. यामुळे सोनी यांना काही युजर्स ट्रोल करीत आहेत. यावेळी राहाने व्हाईट टी- शर्ट आणि पँट वेअर केले होते. या लूकमध्ये राहा प्रचंड क्यूट दिसत होती. तर सोनी यांनी फ्लोरल प्रिंटेड पिंक शर्ट वेअर केला होता. आलियाने तब्बल १ ते १.५ वर्षांनंतर लेक राहाला माध्यमांसमोर आणले. २५ डिसेंबर २०२३ रोजी आलियाने माध्यमांना पहिल्यांदा राहाला दाखवले होता. तेव्हापासून तिच्या क्यूटनेसची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT