Ramayana Movie saam tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

Ramayana Movie Big Update : रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

'रामायण' चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे.

'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'रामायण'मध्ये प्रसिद्ध डान्सरची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

'रामायण' चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला विक्रांत मेस्सी रावणाचा मुलगा मेघनादची भूमिका साकारणार असल्याचे बोले जात होता. मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये मेघनादची भूमिका आता 'किल' आणि 'ड्स ऑफ बॉलिवूड' फेम अभिनेता राघव जुयाल साकारणार आहे. ही भूमिका रावणाच्या मुलची आहे, ज्याला इंद्रजीत म्हणूनही ओळखले जाते.

राघव जुयालला बॉलिवूडमध्ये क्रॉकक्रॉक्स (Crockroaxz) आणि 'स्लो मोशनचा किंग'(King of Slow Motion) म्हणूनही ओळखले जाते. तो एक प्रसिद्ध डान्सर आहे. नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचे दोन भाग बनणार आहे. दुसऱ्या भागात राघव मेघनादची भूमिका साकारणार आहे. आता राघव लवकरच या भूमिकेचे चित्रीकरण सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. आता चाहते राघव जुयालला 'रामायण' मध्ये पाहायला खूपच उत्सुक आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'रामायण' स्टार कास्ट

'रामायण' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे.'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (राम) आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची (सीता) जोडी पाहायला मिळणार आहे. 'रामायण' चित्रपटात साऊथ अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. रवि दुबे लक्ष्मणची भूमिका तर शीबा चड्ढा मंथराची भूमिका साकारणार आहे.

'रामायण' रिलीज डेट

'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. चाहते आता 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहे. 'रामायण' चित्रपटाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT